आजकाल अनेक नवीन चित्रपट, तसेच वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. परंतु या सगळ्यामध्ये मालिकेची क्रेज कुठेही कमी झालेली नाही. मराठी मालिकांसाठी अनेक वाहिन्या उपलब्ध आहेत. परंतु स्टार प्रवाह या वाहिनीवरील प्रत्येक मालिका घराघरात प्रसिद्ध आहे. स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वी “ठरलं तर मग” या मालिकेने एण्ट्री घेतली असून या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करताना दिसतायत. या मालिकेने आता स्टार प्रवाहावरील सर्वच मालिकांना मागे टाकत नंबर वनच स्थान मिळवलं आहे. (Tharal Tar Mag TRP)
काही दिवसांपूर्वी “आई कुठे काय करते” आणि “रंग माझा वेगळा” या दोन्ही मालिका टीआरपी वर नंबर वन स्थानावर होत्या. परंतु या दोन्ही मालिकेंना मागे टाकत “ठरलं तर मग” या मालिकेने पहिले स्थान पटकवलं आहे. ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा 2023’ यानंतर “ठरलं तर मग” या मालिकेने टीआरपी मध्ये ६.९ रेटिंग मिळवलं आहे.

हे देखील वाचा: गर्ल चिलींग इन समर… रिंकूचा समर लुक तुम्ही पाहिलात का ?
या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली मुख्य पात्र साकारताना दिसत आहेत. सध्या मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार अर्जुन आणि तन्वीच नुकतंच लग्न झालं असून, त्यांची केमेस्ट्री जुळताना दिसत आहे. या मालिकेतील अर्जुन आणि सायली ही जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडताना दिसत आहे. (Tharal Tar Mag TRP)
टीआरपी च्या रेस मध्ये सध्या पाच मालिका आपलं स्थान निर्माण करण्यास यशस्वी ठरल्या आहेत. टीआरपी मध्ये “स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३” हा सर्वात वरच्या स्थानाचा पुरस्कार आहे. तर “ठरलं तर मग” ही मालिका त्यानंतर सर्वात जास्त पहिली जाणारी मालिका आहे. त्यानंतर आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं, स्टार प्रवाह पुरस्कार सोडला तर या चार मालिका टॉप फोरवर असल्याचं पाहायला मिळतंय. याच बरोबर कलर्स मराठीवरील इतर मालिकांपैकी “भाग्य दिले तू मला” ही मालिका टीआरपी मध्ये पुढे असल्याचं दिसतेय तसेच झी मराठीवरील “नवा गडी नवं राज्य” ही मालिका देखील टीआरपी मध्ये पुढे असल्याचं पाहायला मिळतंय.