Bigg Boss Marathi 6 Controversy : ‘बिग बॉस मराठी’ सिझन सहा हे पर्व आता संपणार आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहील आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात विविध कलाविश्वात स्पर्धक दिसले. यंदाच्या पर्वात मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊतही सहभागी झाली होती. मात्र सोनालीचा या घरातील प्रवास हा अल्पावधीतच संपला. सोनालीला ‘बिग बॉस’च्या घरात असताना अनेक अडचणी आल्या. शोमधून बाहेर येताच सोनालीने ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिला आलेल्या अडचणीबाबत सांगितलं. घरातील अस्वच्छतेबाबत सोनालीने बरंच काही सांगितलं. या अस्वच्छतेचा सोनालीला बराच त्रास झाला. आता अखेर ‘बिग बॉस’च्या शेवट असताना सोनालीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
यांत थेट सोनालीने फोटो प्रूफ दाखवत ‘बिग बॉस’मधील अस्वच्छतेचा तिला त्रास झाल्याबाबत सांगितलं. सोनालीने पोस्टद्वारे अंगावर आलेले पुरळ, लाल चट्टे दाखवले. आणि ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरही बरेच दिवस तिला हा त्रास होत असल्याचं सांगितलं. सोनालीने ही पोस्ट शेअर करत त्याखाली लिहिलं, “रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालायचा असं नाही. मी खूप विश्वासाने ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात प्रवेश केला होता. पण, मला या घरात वेगळाच अनुभव आला”.
आणखी वाचा – आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…
पुढे तिने घरातील वाईट अवस्थेबाबत म्हटलं, “घरातील अस्वच्छ परिस्थितीमुळे मला स्केबीज (Scabies) हा त्वचेचा संसर्ग झाला. स्वयंपाक घरात उंदीर होते, झुरळं होती… या सगळ्यामुळे प्रचंड त्रास झाला. या ग्लॅमरच्या पलीकडचं हे भीषण वास्तव आहे. मला टॉवेल, रेझर यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तूही शेअर कराव्या लागल्या. यामुळे स्किन इन्फेक्शन झालं. आपल्यापैकी कोणालाही अशाप्रकारे करिअर आणि आरोग्यापैकी एकाची निवड करावी लागू नये”.
आणखी वाचा – “१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”
सोनालीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे आणि काळजी घेण्यास सांगितलं आहे.




