बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चैतन्यसमोर अर्जुन साक्षीचा खरा चेहरा आणणार का?, कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सत्य येणार समोर?, नवा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 23, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Promo

चैतन्यसमोर अर्जुन साक्षीचा खरा चेहरा आणणार का?, कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सत्य येणार समोर?, नवा ट्विस्ट

‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. एकामागोमाग मालिकेत रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच मालिकेत नुकतीच अर्जुनची रियुनियन पार्टी पार पडलेली पाहायला मिळाली. या पार्टीला अर्जुन सायलीलाही बरोबर घेऊन जातो. सगळेजण तिकडे जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यावेळी सायलीच्या हाती खूप मोठी गोष्ट लागते. सायलीच्या हाती साक्षीचा जुना फोटो लागतो. तो फोटो पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. (Tharal Tar Mag Promo)

घरी आल्यानंतर सायली तो फोटो अर्जुनच्या हातात देते. तो फोटो पाहून अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो. फोटो पाहिल्यानंतर अर्जुन सायलीला साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सांगतो. त्यानंतर साक्षीमुळे आपला मित्र कुणाल कायमचा दुरावला असं म्हणत तो दुःखी होतो. आता कुणालसारखी वेळ चैतन्यवर येईल का अशी भीती अर्जुनला वाटते. अर्जुन याबाबत चैतन्यबरोबर बोलण्याचा निर्णय घेतो. अर्जुन चैतन्यला घरी बोलावून घेतो. सुरुवातीला चैतन्य यायला आढेवेढे घेत असतो पण नंतर तो भेटायला यायला तयार होतो.

आणखी वाचा – अहिल्यादेवींच्या हातातून रक्त, व्रत पूर्ण करताना पाण्याने भरलेलाही हंडा पडला, भटजींनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील मुलाचा जीव धोक्यात?

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

चैतन्य घरी येतो आणि तो साक्षीला अर्जुनने मला घरी बोलावलं आहे. अर्जुनने चैतन्यला नेमकं का घरी बोलावलं याची चिंता साक्षीला वाटू लागते. त्यामुळे ती मुद्दाम नाटक करत त्याला म्हणते की मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार कारण तू तिथे गेलास की अर्जुन तुझा अपमान करणार आणि हे मला सहन होणार नाही. आता यापुढे आपल्याला दोघांना एकत्र जगायचं आहे त्यामुळे येणाऱ्या संकटांना सुद्धा आपण दोघांनी एकत्रच फेस करायचे. साक्षी आपली इतकी काळजी घेते हे पाहून चैतन्यला बरं वाटतं आणि तो तिला घेऊन जायला तयार होतो.

आणखी वाचा – “४० प्रयोगांनंतर बायकोने माझं नाटक पाहिलं अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “डोळ्यांत पाणीही आलं आणि…”

चैतन्य आल्याचा पाहून अर्जुनला बरं वाटतं पण मागे उभ्या असलेल्या साक्षीला पाहून त्याचा रागाचा पारा चढतो. मी इथे तुला एकट्याला बोलावलं होतं. मग तू तिला इथे का आणलंस. यावर चैतन्य म्हणतो की, साक्षी माझी बायको आहे आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट बायकोला माहिती असलीच पाहिजे. आता या दोघांमध्ये मोठा वाद होईल याची चिंता सायलीला वाटत असते. आता साक्षीबाबत अर्जुन चैतन्यला खरं सांगणार का?, साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: colors marathimarathi serialtharal tar magTharal Tar Mag Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Santosh Juvekar shared a special video with bolywood actor Vicky Kaushal.

Video : "भावा जिंकलंस", विकी कौशलबरोबर संतोष जुवेकरचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहते भारावले, घट्ट मैत्री, धमाल गप्पा अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.