शुक्रवार, ऑगस्ट 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींच्या हातातून रक्त, व्रत पूर्ण करताना पाण्याने भरलेलाही हंडा पडला, भटजींनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील मुलाचा जीव धोक्यात?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 23, 2024 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
paaru serial update

अहिल्यादेवींच्या हातातून रक्त, व्रत पूर्ण करताना पाण्याने भरलेलाही हंडा पडला, भटजींनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील मुलाचा जीव धोक्यात?

‘पारू’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने या मालिकेला खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेत एकामागोमाग एक टर्निंग पॉईंट येताना पाहायला मिळत आहेत. अशातच मालिकेत नुकताच प्रीतम व दिशाचा साखरपुडा समारंभ थाटामाटात पार पडला. प्रीतम व दिशाच्या साखरपुड्यानंतर मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. दोघांच्या साखरपुड्यांनंतर किर्लोस्कर कुटुंबियांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. (paaru serial update)

मालिकेत अहिल्यादेवी यांना त्यांचे गुरुजी संकटाची चाहूल देतात. यावर उपाय म्हणून ते अहिल्यादेवी यांना एक दिवस निर्जल उपवास करण्यास सांगतात. गुरुजींच्या सांगण्यावरुन अहिल्यादेवी निर्जल उपवास करतात. अहिल्यादेवींनी घरावरील संकट दूर करण्यासाठी उपवास केला हे पारूला समजतं. तेव्हा तिच्या देवी आईने उपवास धरला हे समजताच ती स्वतःही उपवास धरण्याचा निर्णय घेते. त्यानंतर किर्लोस्करांकडे दिशाही आलेली असते.

आणखी वाचा – अन्नदानातून समाजसेवा! अरुण कदम यांनी टाटा हॉस्पिटल बाहेरील गरजूंसाठी केली जेवणाची सोय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दिशा अहिल्यादेवींनी इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही. अहिल्यादेवी उपवास ठेवतात हे समजताच दिशा देखील उपवास ठेवायचा निर्णय घेते. दिशा अहिल्यादेवींजवळ बसून असते. अहिल्यादेवींना दिशाच फार कौतुक वाटतं. त्यानंतर दिशा तिला भूक सहन होतं नाही म्हणून दामिनीच्या रूममध्ये खायला ऑर्डर करते. आणि सगळ्यांची नजर लपवून खायला जाते. त्यावेळी प्रीतम व पारू दिशाला पकडतात. तितक्यात घाईघाईत खात असताना दिशाच्या गळ्यात घास अडकतो. तेव्हा पारू धावत येत तिच्या पाठीवर धपाटा मारते, त्यावेळी घरातील सगळेचजण तिथे येतात.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात सहकुटुंब गृहप्रवेश, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझ्या माणसांमुळे…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दिशा सर्वांना बघून खूप घाबरते. दिशाच सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते मी माझ्या आयुष्यात कधीच उपवास धरला नाही म्हणून मला आजही उपवास करणं जमलं नाही. यावर अहिल्यादेवी हसतात. त्यानंतर अहिल्यादेवी मंदिरात जात असतात तेव्हा त्यांच्या हातातील काचेची बांगडी फुटते. काचेची बांगडी फुटताच अपशकुन घडतो. त्यानंतर अहिल्यादेवी डोक्यावर हंडा घेऊन मंदिरात जात असतात. त्यावेळी त्यांचा तोल जातो आणि हंडा खाली पडतो. आता हा अपशकुन तरी अहिल्यादेवींचे डोळे उघडणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pradeep Rawat passing
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे ७४व्या वर्षी निधन, सलमान खानही भावुक, म्हणाला, “अनेक चांगले…”

ऑगस्ट 6, 2026 | 10:53 am
dipika kakar ibrahim emotional
Entertainment

कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

ऑगस्ट 4, 2026 | 10:03 am
Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Next Post
Vikas Patil Post

"४० प्रयोगांनंतर बायकोने माझं नाटक पाहिलं अन्…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला, "डोळ्यांत पाणीही आलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.