शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, "मी चांगली आई आहे का?"

Alia Bhatt Has Opened Up About Motherhood : अलीकडेच आलिया भट्टने पालकत्व, इंटरनेटचे युग, ट्रोलिंग आणि अपयशाची भीती या विषयांवर सद्गुरूंशी भाष्य केलं. यावेळी एका सेशनमध्ये आलिया भट्टने सद्गुरुंना तिची तीन वर्षांची मुलगी राहाबाबत पालकत्त्वाचा सल्ला विचारला. याबाबत भीती व्यक्त करताना, अभिनेत्रीने त्यांना सांगितले की, ‘तिच्या लहान मुलीमध्ये आधीच अपयशाची चिन्हे दिसू लागली आहेत’. आलिया भट्टने सद्गुरूंना पालकत्त्वाबाबत तिच्या मानसिक अस्वस्थतेबद्दल प्रश्न केला. त्यांनी विचारले, “कोणत्याही पालकांना आपण चांगले पालक आहोत की नाही याची काळजी वाटत असेल, तर त्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला काय असेल?”, या प्रश्नाला अध्यात्मिक नेत्याने उत्तर दिले की, “चिंताग्रस्त पालक चांगले पालक नसतात”.

आलियाने त्यांच्याशी अपयशाच्या भीतीबद्दलही बोलली. त्यांनी सद्गुरूंना सांगितले की तिची मुलगी राहामध्ये देखील लक्षणे दिसू लागली आहेत. ती म्हणाली, “
आपल्या सर्वांना अपयशाची भीती वाटते. माझी मुलगी मोठी होत असताना तिला नेहमी जिंकायचं असतं. दुसरं कोणी आधी आलं तर फसवणूक झाल्याचे ती म्हणते. मी त्याला समजावून सांगते की नाही, तो पहिला आला आहे. पुढे संवाद साधताना आलिया म्हणाली, “मी साडेतीन वर्षांच्या मुलीची आई आहे आणि ती माझ्या आयुष्यातील आनंद आहे. मला प्रत्येक क्षणी काळजी वाटते. एकदा माझ्या वडिलांनी मला विचारले की आई म्हणून कसे वाटते, मी त्यांना सांगितले की आनंद आणि चिंता या संमिश्र भावना होत्या. मला सतत प्रश्न पडतो की मी चांगली आई आहे का?”. याबद्दल सद्गुरुंनी अभिनेत्रीला सावध केले, ते म्हणाले की चिंताग्रस्त पालकांमुळे मुलाचा फायदा होत नाही, उलट जास्त काळजी केल्याने शेवटी मुलाचे नुकसान होते. यासोबतच तिने आलियाला आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीकडून आयुष्य कसे जगायचे हे शिकण्याचा सल्लाही दिला.

आणखी वाचा – ‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया भट्टने सद्गुरूंना मुलांच्या संगोपनाबद्दल विचारले आणि या विषयावर त्यांचा सल्ला घेतला. सद्गुरूंनी विचारले, “तुम्हाला मूल झाल्यावर त्याला काहीही शिकवायचे आहे, हा विचार सोडून द्या. मला माहित आहे की तू एक अद्भुत स्त्री आहेस पण तू आणि तुझी साडेतीन वर्षांची मुलगी यांत जास्त कोण आनंदी आहे?’ यावर आलिया म्हणाली, “राहा”. पालकांनी आयुष्यभर सल्लागाराची भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. आलियाला सल्ला देताना, ते म्हणाले की, “तिने फक्त आपल्या मुलीला मोठे होताना पाहत राहावे, कारण शिकवण्यासारखे फार काही नाही कारण प्रौढ लोक आयुष्याला फक्त त्यांच्या दृष्टीकोनातून पाहतात आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करु लागतात”. याविषयी अध्यात्मिक गुरु पुढे बोलले. ते म्हणाले की 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुले सहसा आनंदी असतात, तर प्रौढांना असे नसते. ही बाब स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, “पूर्वी कोणीतरी तुम्हाला दुःखी करण्यासाठी खूप कष्ट करायचे. आज तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल”

आणखी वाचा – बॉयफ्रेंडकडून विश्वासघात, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; ४० व्या वर्षी सुप्रसिद्ध कोरियोग्राफर राहतेय एकटी, मुलं नको म्हणून…

सद्गुरुंनी असेही सांगितले की ते दिवसातून फक्त चार ते साडेचार तास झोपतात. हे ऐकून आलिया आश्चर्यचकित झाली. यावर तिने तिची दिनचर्या शेअर केली आणि सांगितले की ती दिवसातून आठ ते नऊ तास झोपते. हे ऐकून अध्यात्मिक गुरूंनी गंमतीने विचारले, “मग तुम्ही कधी जगणार?”

Tags: alia bhattalia bhatt motherhoodbollywood actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Bapya Marathi Movie Songs

'कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.