Digambar Naik Controversy : सोशल मीडियामुळे हल्ली फेम मिळवणं सोप्पं झालंय असं बरेच कलाकार बोलताना दिसतात. सिनेइंडस्ट्रीत कंपूशाही असण्यावरही अनेकदा कलाकारांनी भाष्य केल आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी चित्रपटात भूमिका न मिळण्याबाबत भाष्य केलं आहे. मालवणी भाषा येणाऱ्या कलाकारांना मालवणी चित्रपटात भूमिका दिलीच जात नाही याबाबत त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. इतकंच नाहीतर मालवणी निर्माते असूनही मालवणी कलाकाराला प्रोजेक्टमध्ये घेत नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मालवणी चित्रपटात न घेण्याबाबत त्यांना खंत वाटते, असं ते यावेळी स्पष्ट म्हणाले.
दिगंबर नाईक यांनी ‘इट्स मज्जा’च्या behind the fame या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “इंटव्ह्यूच्या सुरुवातीलाच तुम्ही मला विचारलं कुठे आहात तुम्ही?, यावरूनच कळालं की, दिगंबर नाईककडे दुर्लक्ष केलं, कारण असं आहे की, मी मोठेपणा म्हणून सांगितलं की सगळे निर्माते कोकणातील आहेत, मालवणी आहेत. सिंधुदुर्गातील आहेत त्यांना मालवणी माणूस नको असतो. आणि जर हवा असता तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो दिसला असता. बरं, आता तो दिसण्यासाठी, फेम लागतो, चेहरा लागतो तो माझ्याकडे आहे. माझ्यासारख्या काही लोकांकडे आहे. तर हे एक दुःख आहे. दुसरी गोष्ट अशी माझं मालवणीवर प्रेम आहे तर ते आहेच, ते आतून असावं लागतं. खोटं असेल तर लोकांना लगेच कळतं. सोशल मीडियामुळे ते रीलस्टार झाले”.
आणखी वाचा – आशा भोसले अनंतात विलीन, मुलाने पार पाडलं कर्तव्य, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…
पुढे ते म्हणाले, “दुर्लक्षित कलाकार तेव्हा होतो जेव्हा मी ‘फु बाई फु’ करायचो. कारण तेव्हा माहित नव्हतो. आता इंस्टावर कोकणातील बरेच कलाकार दिसतात. आपण शो केला त्यात कोकणतील बरेच कलाकार आहेत. मी गाव गाता केली त्यात कोकणातील कलाकार होते. अशा बऱ्याच मालिकांमध्ये कोकणातील कलाकार आहेत. बहुतांशी फिल्म्स या कोकणात शूट होतात. त्यात छोटे-मोठे रोल करायला बरीचशी लोक काम करतात. कलागुणांना वाव मिळायला ते करतात. पण आता कोकणातील फिल्म आहे, कोकणावर केलेली फिल्म आहे. याचा विषयच कोकण आहे, तर त्यात तुम्हाला कोकणी कलाकार दिसत नाही. यांत मालवणी भाषा सोडून दुसरी भाषा बोलणारे मालवणी बोलतात. ‘माका आंबा व्हया’ हे काय मालवणी आहे का?, पण आमची मालवणी माणसं बिचारी ते सहन करतात. हेच एखाद वाक्य मराठी भाषेत चुकीचं बोललात तर ते तुम्हाला मॅसेज करतील, हे वाक्य चुकीचं बोललात. कोकणातील माणूस असाच आहे, येवा कोकण आपलोच आसा असं म्हणतो आणि दुर्लक्ष करतो”.
शेवटी त्यांनी म्हटलं, “असे बरेच चित्रपट आहेत ज्यात मी नंतर आलोय, बॅकग्राउंड आवाज द्यायचा असेल, गाऱ्हाणं घालायचं असेल तेव्हा ए तू कर ना दिग्या. सिनेमाच्या प्रमोशसाठी व्हिडीओ बनव ना असं बरीच लोक करतात. पण कोकणच्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात मालवणी बोलणारा अस्सल कलाकार हवा असं नाही राहिलं आता. असं असतं तर दशावतार चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता ना?, एकत्र दशावतार वर माझं प्रचंड प्रेम आहे. मी जितकं दशावतार पाहिलं तेवढं त्या कलाकारांनी पाहिलंही नसेल. मी असलो असतो त्याच्यामध्ये पण मी नाही आहे त्याच्यामध्ये. असं होतं त्याला काही ईलाज नाही. आणि याची खंत वाटते. त्यात सुदैवाने आणि दुर्दैवाने मला फोन येतात लोकांचे, अरे तू का नाही आहेस रे यांच्यामध्ये. कदाचित त्यांना असं वाटत असेल दिगंबर नाईकला घेतलं तर चित्रपट विकला जाणार नाही”.




