गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bapya Marathi Movie Songs

'कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

Bapya Marathi Movie Songs : युवावर्गाची ऊर्जा, बिनधास्त अटिट्यूड आणि भन्नाट लय यांचा परफेक्ट संगम असलेलं ‘कारट्या’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘वर्किंग आय फिल्म्स’ प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील हे नवं रॅप गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय. या गाण्याच रॅपसोबतच आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, त्याची अफलातून दृश्य मांडणी. आजवर अनेक रॅप गाणी आली असली तरी ‘कारट्या’ हे गाणं आपल्या वेगळ्या चित्रणशैलीमुळे ठळकपणे उठून दिसतंय. या गाण्याचं चित्रीकरण एक्स्ट्रा वाइड डायनॅमिक कॅमेरा लेन्सिंगमध्ये करण्यात आलं असून, मोठ्या पडद्यावर पाहाताना हा अनुभव अक्षरशः भव्य वाटेल. विशेष म्हणजे, या गाण्यासाठी पहिल्यांदाच इंस्टा ३६० कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये वेगळेपणा आणि नवी ऊर्जा जाणवते.

समुद्रकिनाऱ्यावर चित्रीत केलेली रंगतदार दृश्यं, सतत बदलणारे अँगल्स, विस्तृत फ्रेम्स आणि अनोख्या कॅमेरा हालचालींमुळे ‘कारट्या’ हे गाणं मोठ्या पडद्यावर एक भन्नाट अनुभव ठरतो. प्रेक्षकांना जणू त्या क्षणांचा भाग असल्याची जाणीव करून देणारी ही सिनेमॅटिक मांडणी आजच्या तरुणांच्या दृष्टीकोनाशी थेट जोडली गेली आहे. आजच्या तरुणाईचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हा पारंपरिक चौकटींपेक्षा खूप वेगळा आणि मोकळा आहे. जिथे मोठ्यांची विचारसरणी अनेकदा मर्यादित आणि एका ठराविक चौकटीत अडकलेली असते, तिथे तरुणांचं जगाकडे पाहाणं अधिक व्यापक, निर्बंधमुक्त आणि शोध घेणारं असतं. ‘कारट्या’ हे गाणं हाच अतिविस्तृत दृष्टीकोन अत्यंत प्रभावीपणे मांडतं. रॅप हा मुळात वैयक्तिक, भावना व्यक्त करण्याचा प्रकार आहे. ‘कारट्या’मध्येही हीच ऊर्जा दिसते, पण ती केवळ शब्दांत नाही तर प्रत्येक फ्रेममध्ये, प्रत्येक कॅमेरा अँगलमध्ये जिवंत होते. त्यामुळे हे गाणं फक्त ऐकण्यापेक्षा अनुभवण्यासारखं बनतं.

आणखी वाचा – आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

या गाण्याला गायक पल्लवी परांजपे आणि अभिजीत चंद्रकला यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. अभिजीत चंद्रकला यांनीच या गाण्याला तुफान ऊर्जा देणारं संगीत दिलं असून, गीतकार शौनक नारळे (असर) यांनी तरुणांच्या भावना अचूक शब्दांत पकडत गाण्याला खास ओळख दिली आहे. समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तिवारी आणि समीर तिवारी यांनी केली आहे. युवावर्गाच्या उर्जेने आणि वेगळ्या दृश्यशैलीने भरलेलं ‘कारट्या’ गाणं आधीच चर्चेत आलं असून, आता येत्या १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

Tags: Bapya Marathi Moviemarathi moviemarathi song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Next Post
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.