सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “भावा जिंकलंस”, विकी कौशलबरोबर संतोष जुवेकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते भारावले, घट्ट मैत्री, धमाल गप्पा अन्…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 23, 2024 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Santosh Juvekar shared a special video with bolywood actor Vicky Kaushal.

Video : "भावा जिंकलंस", विकी कौशलबरोबर संतोष जुवेकरचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहते भारावले, घट्ट मैत्री, धमाल गप्पा अन्...

‘झेंडा’, ‘मोरया’, ‘शाळा’, ‘बॉईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. आजवर अनेक चित्रपटांतून नानाविध भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त संतोष हा सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबद्दलची माहिती देत असतो. त्याचबरोबर कुशल बद्रिके व अभिजीत चव्हाण यांच्याबरोबरचे धम्माल व्हिडीओही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.

अशातच संतोषने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता लवकरच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाचे शूटिंग आता संपले असून याबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे. संतोषने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबरचा मजामस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

संतोषने हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “शेवटी माझं शूट संपल. पण शूटिंगचे हे दिवस आठवणीत राहतील. कारण उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगतं आणि त्यामुळे त्या कामात मनही रमतं. या व्हिडीओमधून तुम्हाला (प्रेक्षकांना) आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल, पण मला खात्री आहे चित्रपटाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय मेहनत केली आहे याचीसुद्धा तुम्हाला कल्पना येईल”.

आणखी वाचा – अन्नदानातून समाजसेवा! अरुण कदम यांनी टाटा हॉस्पिटल बाहेरील गरजूंसाठी केली जेवणाची सोय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आम्ही कलाकार जेव्हा एखादं नवीन काम करतो तेव्हा नवीन माणसांची व नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आणि आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम. तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत” तसेच यापुढे संतोषने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि त्याच्या संपूर्ण डिरेक्शन टीमचा त्याचबरोबर विकी कौशलचं उल्लेख करत “सगळ्यांना खुप खुप प्रेम” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “ठाण्याचे असतील तलाव फेमस पण नाशिकची नदी…”, चेतन वडनेरेचा बायकोसाठी खास उखाणा, मंडपातील व्हिडीओ समोर

यापुढे त्याने “आपण सर्वांनी केलेल्या आपल्या मेहनतीला आई भवानीचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद लाभुदे हीच इच्छा व प्रार्थना” असं म्हटलं आहे.  दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एकच वादा, संतोष दादा., कमाल, वा दादा, जबरदस्त” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Tags: entertainment newssantosh juvekarvicky kaushal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Prince Narula Yuvika Chaudhary Expectiong Baby

लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-बाबा होणार होणार युविका चौधरी व प्रिन्स नरुला?, चिमुकल्या बाळाची चाहुल, म्हणाला, "लवकरच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.