‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन पसंती दे आहेत. या मालिकेतील कथानकाने आजवर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत केली. सध्या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने अव्वल स्थान पटकावलेलं पाहायला मिळतंय. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात. अशातच सायली व अर्जुनचा मालिकेत सध्या रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे ती मालिका प्रेक्षकांना विशेष भावत आहे. (Tharal Tar Mag Promo)
अशातच समोर आलेल्या भागांमध्ये सायली अर्जुनच्या प्रेमात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. आधीपासूनच अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला होता. मात्र अद्याप अर्जुनने सायली समोर प्रेमाची कबुली दिलेली नाही. तर आता सायलीदेखील अर्जुनच्या प्रेमात पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. सायलीने तिच्या मोबाईलवर अहो या नावाने अर्जुनचा नंबर देखील सेव्ह केलेला पाहायला मिळत आहे. अर्जुन ऑफिसला गेल्यावर ती त्याच शर्ट घालून त्याच्या आठवणीत रमलेली पाहायला मिळत आहे. तर सायलीचे हे वागणं पाहून अर्जुनलाही संशय येऊ लागतो. मात्र अर्जुनला असं वाटतं की सायली चांगली बायको होण्याचं नाटक करत आहे.
आश्रम मर्डर केस संबंधित पुरावे घेण्यासाठी अर्जुन व सायली एक नवा डाव आखतात. अर्जुन प्रियाला खोटा फोन करुन तिला अडकवण्याचा प्रयत्न करतो. मात्र साक्षी व चैतन्य प्रियाला अर्जुनच्या या संकटातून वाचवतात. अर्जुनने प्रियाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी चांगलाच ट्रॅप बनवलेला असतो. मात्र तिथे प्रिया पोहोचत नाही. सायली व अर्जुन बराच वेळ प्रियाची वाट बघतात पण ती काही येत नाही हे बघून ते दादूला पैसे देऊन जायला सांगतात. घरी येऊन दोघेही प्रिया तिथे का आली नाही याचाच विचार करत असतात.
कोर्टकचेरी, पुरावे या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसांसाठी फार वेगळ्या असतात त्यामुळे घाबरून प्रिया गेली असल्याचं ती चैतन्यसमोर कबुल करते. प्रियाचं बोलणं ऐकून चैतन्याला प्रिया निर्दोष वाटते. साक्षी मनोमन खुश होते आणि म्हणते की, चैतन्याला पाळलं याचा मला आता फायदा होत आहे.