Zee Natya Gaurav 2024 : ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. बरेच दिवसांपासून नाटक विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या नाटकांदरम्यानचे अनेक किस्से, आठवणी, गमती-जमती शेअर केल्या. तेव्हापासून या सोहळ्याची उत्सुकता अधिक वाढून राहिली होती. नुकताच हा सोहळा टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला. रंगभूमीवरील मानाचा सोहळा असलेल्या या पुरस्कार सोहळ्याची नेहमीच चर्चा रंगते. नुकत्याच झालेल्या या पुरस्कार सोहळ्यातील कलाकारांच्या विजेत्यांची यादी समोर आली आहे.
यंदाच्या या झी नाट्य गौरव २०२४ या सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी सहभाग दर्शविला. प्रशांत दामले, मोहन जोशी, संजय मोने, वंदना गुप्ते, कविता मेढेकर, सुकन्या मोने, प्रिया बापट, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अमृता देशमुख, वैभव मांगले, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांसारख्या अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.
या खास सोहळयाला अनेक कलाकारांनी नाटकांदरम्यानचे प्रवेशांक सादर केले. यंदाच्या ‘झी नाट्य गौरव’मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर प्रिया व उमेश यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाने पुरस्कारांमध्ये बाजी मारली.
‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळा विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – रितुपर्णा किर्तोनिया (प्रायोगिक नाटक-काक्षी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सई कदम, निशांत शिंदे (प्रायोगिक नाटक-रुक्मिणी)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – प्रणव सपकाळे (प्रायोगिक नाटक -कलगीतुरा)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – राहुल ढेंगळे, साहिल सावंत (प्रायोगिक नाटक -खुदीराम)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – कमलेश बिचे – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – नीरजा पटवर्धन – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – अमोघ फडके – जन्मवारी (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट नेपथ्य -संदेश बेंद्रे – २१७ पद्मिनी धाम (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट संगीत – ऋषिकेश शेलार (प्रायोगिक नाटक-कलगीतुरा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निरंजन पेडगावकर (प्रायोगिक नाटक- पाच फुटाचा बच्चन )
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – निनाद म्हैसाळकर – चाणक्य (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अनुष्का बोऱ्हाडे (प्रायोगिक नाटक – मॅड सखाराम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सोमनाथ लिंबस्कर (प्रायोगिक नाटक – अण्णांच्या शेवटच्या इच्छा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी अजय – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – आशुतोष गोखले – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – अनिता दाते – माझ्या बायकोचा नवरा (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – वैभव मांगले-मर्डरवाले कुलकर्णी (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक – मर्डरवाले कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट लेखन – दत्ता पाटील (प्रायोगिक नाटक) – कलगीतुरा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – मोहित टाकळकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
सर्वोत्कृष्ट लेखन – चिन्मय मांडलेकर – गालिब (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर, रणजित पाटील – जर तरची गोष्ट (व्यावसायिक नाटक)
नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर- अमृता पवार
सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी : प्रिया बापट , उमेश कामत
जीवनगौरव पुरस्कार २०२४ – मोहन जोशी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मल्लिका सिंग हंसपाल (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ललित प्रभाकर (प्रायोगिक नाटक) – घंटा घंटा घंटा घंटा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता देशमुख – नियम व अटी लागू (व्यावसायिक नाटक )
सर्वोत्कृष्ट बालनाट्य – चेरी एके चेरी
विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटक – कलगीतुरा
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक – घंटा घंटा घंटा घंटा
विशेष प्रबळ व्यक्तिमत्व : अनिता दाते
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – जर तरची गोष्ट