बॉलिवूड सिनेसृष्टीत येऊन करिअर करणं आणि नाव कमावणं सोप्प काम नाही. असे अनेक कलाकार आहेत जे काही चित्रपट करुन कधी आले आणि कधी गायब झाले, हे कळलंसुद्धा नाही. सिनेसृष्टीतील या काही कलाकारांची कारकीर्द अल्पावधीतच संपली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अमृता अरोरा. अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराची बहीण आहे. अमृता अरोरा हिने आपल्या करिअरची सुरुवात व्हिडीओ जॉकी म्हणून केली होती. (Know About Amruta Arora lovelife)
तिने २००२ मध्ये ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकला नाही. यानंतर अभिनेत्रीने बरीच वर्षे काम केले, परंतु बॉलिवूडमध्ये तिला हवं तसं यश मिळालं नाही. अमृताचे प्रोफेशनल लाइफ भलेही चर्चेत नसेल, पण तिचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिलं. २००४ मध्ये अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफजल या नावाबरोबर जोडली गेली होती. उस्मान एका क्रिकेट मॅचसाठी भारतात आला होता आणि त्यादरम्यान त्यांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
उस्मानबरोबरच्या रिलेशनशिपच्या बातमीवर अमृतानेही प्रतिक्रिया दिली होती. अमृताने उस्मानला खास मित्र असल्याचं म्हटलं. मात्र, ही खास मैत्री फार काळ टिकली नाही. ती म्हणाली, “माझी उस्मानबरोबर तेव्हढी ओळख नाही. मी त्याला काही महिन्यांपूर्वीच भेटले होते आणि ही चांगल्या नात्याची सुरुवात आहे. मला उस्मानबरोबर छान वाटतं. माझ्या आयुष्यावर त्याचा मोठा प्रभाव आहे. आम्ही खास मित्र आहोत”. २००९मध्ये अमृताने पेशाने व्यावसायिक असणाऱ्या शकील लडाकशी लग्न केले. शकील हा अमृताचा कॉलेजच्या दिवसांपासूनचा मित्र होता. पण त्यानंतर शकीलने अमृताची मैत्रिण निशाबरोबर लग्न केले. पण २००८मध्ये शकीलने पहिली पत्नी निशा हिला घटस्फोट दिला आणि नंतर अमृताशी लग्न केले. त्यावेळी अमृताला होम ब्रेकरचा टॅगही मिळाला होता. घटस्फोटानंतर निशाने अमृतावर अनेक आरोपही केले होते. अमृतामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं तिने म्हटलं होतं.
Video : देशमुखांच्या घरी नवं वादळ, संजना आणि अनिरुद्धचा होणार घटस्फोट, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता
मात्र, २००९ मध्ये अमृता आणि शकील यांचा अगदी थाटामाटात लग्न झाले. प्रथम अमृताने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. त्यानंतर पंजाबी परंपरेने लग्न केले. अमृताने ‘आवारा पागल दीवाना’, ‘एक और एक घायाल’, ‘रक्त’, ‘फाईट क्लब’, ‘रामा रामा क्या है ड्रामा’, ‘हीरोज’, ‘हॅलो’, ‘कमबख्त इश्क’, ‘एक टू चान्स’ आणि ‘कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ’, सारखे चित्रपट केले आहेत.