आजवर प्राजक्ता माळीने तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या सौंदर्याचेही लाखो चाहते दिवाने आहेत. इतकंच नव्हेतर प्राजक्ता तिच्या फोटोशूटमुळेही विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळते. सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. या सूत्रसंचालनामुळेच अभिनेत्रीला खऱ्या अर्थाने विशेष लोकप्रियता मिळाली आहे. प्राजक्ताने आजवर मालिका, चित्रपट यांसारख्या अनेक माध्यमातुन महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Prajakta Mali New Post)
सोशल मीडियावर ही प्राजक्ता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या कायद्याचे पालन केलेलं पाहायला मिळत आहे. आता प्रत्येकजण आपल्या नावापुढे आईचं नाव लावू शकतो आणि आईचं नाव लावणं हे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळेच आता या कायद्याचं पालन खुद्द प्राजक्ता माळीनेही केले आहे.
प्राजक्ताने ‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ असं तिचं पूर्ण नाव लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. या पोस्टसह तिने दिलेल्या खास कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे. अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नावदेखील महत्वाचं आहे”.
Video : देशमुखांच्या घरी नवं वादळ, संजना आणि अनिरुद्धचा होणार घटस्फोट, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता
पुढे प्राजक्ता म्हणाली आहे की, “हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट”, असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत नियमाचं पालन केल्यामुळे अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी सरकारच्या या कायद्याचेही कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे.