सध्या ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. नुकताच या मालिकेचा टीआरपी रेट प्रेक्षकांच्या समोर आला असून या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेच्या कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या मालिकेत सायली व अर्जुनच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Tharal Tar Mag Promo)
सायली अर्जुनला प्रेमाने अहो अशी हाक मारते. तेव्हा अर्जुनला वाटत की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायली चांगली बायको होण्याचं नाटक करत आहे. त्यानंतर मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. मालिकेत अर्जुनाची जुनी मैत्रीण मानसी ही तिच्या कोणत्या केसच्या निमित्ताने भारतात परतली आहे. आणि तिची केस अर्जुन लढणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र मानसीच्या येण्याने सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला पाहायला मिळत आहे.
मानसीच येणं आणि अर्जुनच्या जवळ जाणं सायलीला पसंद नाही आहे. त्यामुळे ती चिडचिड करताना दिसते. अर्जुनला इंप्रेस करण्यासाठी ती युक्ती देखील लढवते. अर्जुनला इंप्रेस करायला सायली मॉडर्न कपडे परिधान करते. त्यावेळी अर्जुन तुम्ही आहात तशाच छान दिसता, असं तिला सांगतो. त्यानंतर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अर्जुनची बहीण पुर्णा आजीकडे तक्रार करते, की सायलीने वनपीस सारख्या कपड्यांवर पैसे खर्च केले. तेव्हा पुर्णा आजी सायलीला जाब विचारतात.
तर एकीकडे सायली मधुभाऊंना भेटायला जाते. तेव्हा सायली मधुभाऊंना विचारते की, “मधुभाऊ प्रश्न आमच्या एका मैत्रिणीचा आहे. आपण आपल्या माणसासाठी आपल्यात बदल घडवून आणतो. सतत त्या माणसाचा विचार करत राहतो, या अवस्थेला काय म्हणतात?”, असा प्रश्न विचारते. हे ऐकून मधुभाऊ सायलीला म्हणतात, “तुझ्या या मैत्रिणीची अवस्था पाहून असं वाटतंय की, ती कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. हे खरंतर तुला कळायला हवं ना. तू प्रेमविवाह केला आहेस ना”, असं सांगतात. मधुभाऊंचं बोलणं ऐकून आता तरी सायलीला तिच्या प्रेमाची खात्री पटणार का?, सायली अर्जुनसमोर प्रेमाची कबुली देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.