मंगळवार, ऑगस्ट 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

त्यांनी आईला बाहेर काढले अन्…; रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईला चुकीची वागणूक, म्हणाली, “तिथल्या मॅनेजरने…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 9, 2024 | 6:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Mugdha Godse shared an outraged post about the treatment given to her mother

त्यांनी आईला बाहेर काढले अन्...; रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईला चुकीची वागणूक, म्हणाली, "तिथल्या मॅनेजरने..."

‘फॅशन’मध्ये प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौतच्या भूमिकेचं जेवढं कौतुक झालं तेवढंच कौतुक जॅनेटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचही झालं. बिनधास्त अंदाजात सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या या अभिनेत्रीने ‘फॅशन’द्वारे चित्रपटात पदार्पण केलं. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मराठमोळी मुग्धा गोडसे होय. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अभिनयासह वैयक्तिक आय़ुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या आईला एका ठिकाणी आलेल्या वाईट अनुभवाविषयीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे मुग्धाने आपलं म्हणणं परखडपणे मांडलं असून तिने तिच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे संतापही व्यक्त केला आहे.

WRONGED at all levels … @Chaayos @Salujanitin
Pls take a hard look at your Human Resource employed at the #Chaayos Inorbit Mall Store at Malad W, Mumbai.

Yesterday my mother 'n I had ordered tea to wind down after some heavy shopping.
I had left her alone for 5 mins to get… pic.twitter.com/ncPSf1CT27

— Mugdha Veira Godse (@mugdhagodse267) May 9, 2024

आणखी वाचा – “पांचटगिरी चालू आहे”, हेमांगी कवी व कुशल बद्रिकेच्या हिंदी कॉमेडी शोवर प्रेक्षकांची टीका, म्हणाले, “मराठी शोमधून…”

या पोस्टमध्ये मुग्धाने असं म्हटलं आहे की, “हे खूप चुकीचं आहे. कृपया मालाड पश्चिम, मुंबई येथील इनॉर्बिट मॉलमध्ये असलेल्या नामांकित रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असलेल्या तुमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या. काल (८ मे) माझ्या आईने आणि मी खरेदी केल्यानंतर ‘चायोस’मधून चहा घेतला. त्यानंतर बाजूच्या दुकानातून काहीतरी सामान आणण्यासाठी मी तिला तेथे पाच मिनिटांसाठी एकटीला सोडून गेले होते. परत येताच मी पाहिलं की, ती दुकानाबाहेर जड शॉपिंग बॅग हातात घेऊन असहाय्यपणे उभी होती. तिला असं पाहून मला धक्काच बसला.”

आणखी वाचा – घरात कचरा काढतो, भांडी घासतो अन्…; आईने केलेल्या संस्कारांवर स्वप्नील जोशीचं भाष्य, म्हणाला, “एकुलता एक असल्यामुळे…”

यापुढे तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “याबद्दल मी माझ्या आईला विचारले असता तिने सांगितले की, तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला तिथून जाण्यास सांगितलं. कारण सहा-सात लोकांना तिच्या जागेवर बसायचं होतं. मग मी तिथल्या मॅनेजर दृष्टी यांना याबाबत सांगितलं. पण त्यांनी त्यांची चूक कबूल केली नाही.” यापुढे मुग्धाने “ज्या देशात आपण वृद्ध माणसांचा आदर करतो, तिथे अशी वागणूक मिळणं हा न्याय आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत “माझी यामुळे खूप घोर निराशा झाली आहे.” असं ही म्हटलं आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsMugdha Godse
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
10 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा, तर ‘या’ राशींसाठी ‘शुक्रवार’ लाभदायक, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.