‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांचाच आवडीचा आहे. २००८ पासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना खूप प्रेम मिळाले. या मालिकेमधील जेठालाल, दया, बाबूजी, पोपटराव, टप्पू, बाबिता, सोनू अशी अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ही मालिका अनेकदा वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकली आहे. तसेच या मालिकेतील अनेक पात्रांनी या मालिकेला रामराम देखील केला आहे. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले असून त्याबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. (palak sindhwani aka sonu)
काही दिवसांपूर्वी मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते असित कुमार मोदी यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आपरोप केले होते. जेनिफर यांनी केसही जिंकली. पण असित यांना कोणतीही शिक्षा झाली नसल्याने जेनिफर असमाधानी आहे. दरम्याने आता या मालिकेतील अजून एक कलाकार या मालिकेचा निरोप घेणार आहे. पलक सिंधवानी म्हणजेच मालिकेत सोनूची भूमिका निभावलेली अभिनेत्री या मालिकेचा निरोप घेणार आहे. याबाबत पलकने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
11 एप्रिल रोजी पलकने तिचा २६ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी शेवटचे एपिसोड शूट करणार असल्याची माहिती दिली. पण हे सर्व खोटं असल्याचंदेखील समजल.
तिने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीसाठी, ज्या आठवणी तयार केल्या आहेत त्यासाठी मी सर्वांची ऋणी आहे. आता २०२३ पूर्ण करण्यासाठी २ दिवस बाकी आहेत. जे झालं आहे ते स्वीकारा, विसरा,आशीर्वाद द्या आणि पुढे व्हा. जे योग्य आहे ते करा कारण २०२४ मध्ये मी नवीन वर्षात प्रवेश करत आहे. मी खूप उत्सुक आहे”.
पण यामुळे पलकने तिच्या चाहत्यांबरोबर मस्करी करत असल्याची समोर आले असून ती नवीन वर्षात पदार्पण करत असून पुन्हा एकदा शूटला सुरुवात करणार असल्याचे त्यात म्हंटले आहे.
त्यामुळे पलक सध्या तरी ही मालिका सोडणार नाही. पलकच्या आधी झील मेहताने सोनूची भूमिका केली होती. सध्या या मालिकेमध्ये दिशा वकानी येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.