बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्हाला सुखाने जगू दे”, ईशाने अरुंधतीला सुनावलं, आईलाच घराबाहेर जायला सांगितलं, आशुतोषच्या आईकडूनही त्रास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 13, 2024 | 3:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

"आम्हाला सुखाने जगू दे", ईशाने अरुंधतीला सुनावलं, आईलाच घराबाहेर जायला सांगितलं, आशुतोषच्या आईकडूनही त्रास

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षक विशेष पसंती देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आशुतोष केळकरच्या जाण्याने अरुंधती खचलेली दिसत आहे. दरम्यान सुलेखा ताईंनी आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरले आहे. त्यामुळे सुलेखा ताईंच्या मनातून अरुंधतीची जागा कमी झाली आहे. तसेच त्यांनी केळकरांच्या घरातून अरुंधतीला जाण्यासही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अरुंधती देशमुखांच्या घरी राहत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)

अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेत सध्या गुढीपाडवा विशेष भाग पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या घरी दोन गुढी उभारल्या गेल्या. संजना तिचा तिचा वेगळा गुढीपाडवा साजरा करताना दिसली. तर आता इशाही केळकरांच्या घरी राहायला आलेली असते. इशाला अनिशच प्रेम मिळवायचं असतं म्हणून तिची धडपड सुरु असते. इशा आणि अनिश गुढीपाडवा साजरा करतात. तेव्हा अरुंधतीही तिथे येते. मात्र अरुंधती आलेली सुलेखा ताईंना आवडत नाही. त्या अरुंधतीला पाहून जेवणाच्या ताटावरून उठून जातात. तेव्हा अरुंधतीला रडू येत आणि ती निघून जाणार इतक्यात अनिश तिला अडवतो.

आणखी वाचा – पारूच्या जीवाला होणाऱ्या नवऱ्यापासून धोका, दिशा व दामिनीचा डाव होणार का सफल?, मालिकेत नवा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तेव्हा इशाही अरुंधतीवर चिडते. इशा अरुंधतीला केळकरांकडे आल्याबद्दल तिला दोष देते. इशा अरुंधतीला दोष देत, “तू इथे का आलीस. तुला माझं सुख पाहवत नाही का?, मी अनिशच प्रेम पुन्हा मिळवायचा प्रयत्न करतेय. या घरात माझं स्थान निर्माण करायचा विचार करत आहे. आम्हाला सुखाने जगू देणार आहेस का?, तू इथून जा. तुझ्या आयुष्यातून सुख निघून गेलं आहे, पण आम्हाला सुखात राहू दे”, असं बोलते.

आणखी वाचा – वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ चार उपाय कराल तर घरामध्ये होईल आर्थिक भरभराट, पैशांची चणचणही होईल कमी, जाणून घ्या सविस्तर

यावर अरुंधती सगळ्यांना शांत करते. अरुंधती म्हणते हे माझं आणि आशुतोषच घर आहे. या घरात शांतता राखा. बोलणार असाल तर प्रेमाचे चार शब्द बोला. सर्वांचं आपुलकीने स्वागत करा. या घराला भांडणाचा नाहीतर सुरांची सवय आहे. सुखाने संसार कर. या घराला, सुलेखा ताईंना आणि अनीशला सांभाळ”, असं सांगते. त्यांनतर पुन्हा इशा अरुंधतीला बोलते, “मी सगळं सुखासाठीच करत होते. तूच या आनंदात मिठाचा खडा टाकलास. माझी आता एकच विनंती आहे, कृपया तू या घरात पुन्हा येऊ नकोस”, असं बोलते. यावर अरुंधती पुन्हा कधीच येणार नाही असं म्हणत निघून जाते.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promomarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Swapnil Joshi Visit Ram mandir

रामलल्लाचं दर्शन घ्यायला पोहोचला स्वप्नील जोशी, कपाळी श्रीराम टिळा लावला अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "हा अनुभव…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.