शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोपी बहू झाली आई ! देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी चिमूकल्याचं आगमन,नवऱ्याने सांगितली खुशखबर

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 19, 2024 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Devoleena Bhattacharjee baby boy

देवोलिना भट्टाचार्जीने दिला मुलाला जन्म

टेलिव्हिजनवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहू ही भूमिका अधिक लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र आता ती कोणत्याही भूमिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मॅटर्निटी फोटोशूटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या आनंदामध्ये चाहत्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान आता याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Devoleena Bhattacharjee baby boy)

देवोलिना व शहनवाज हे आई-वडील झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. देवोलिनाने १८ डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “१८ डिसेंबरला आमच्या आनंदाची पेटी, आमच्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे”. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेलो वर्ल्ड! आमचा लाडका छोटा मुलगा इथे आहे. १८.१२.२०२४”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी व मित्रमंडळींनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.   

आणखी वाचा – सलमान खानच्या सहअभिनेत्रीचा गंभीर आजाराशी सामना, उभं राहणंही अशक्य, मदत मागितली नाही कारण…

View this post on Instagram

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

दरम्यान देवोलीनाने १५ ऑगस्ट रोजी एक भावुक पोस्ट लिहीत गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांचे मॅटर्निटी फोटोशूटदेखील चांगलेच व्हायरल झाले होते. या सगळ्या फोटोंमध्ये देवोलीनाचा प्रेग्नन्सी ग्लो बघायला मिळाला. डिसेंबर २०२२ मध्ये देवोलीनाने जिम ट्रेनर शानवाजबरोबर लग्न केले. त्यानंतर पंचामृत अनुष्ठानचे काही फोटोदेखील बघायला मिळाले. हे अनुष्ठान गर्भवती महिलांसाठी केले जाते.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाची आत्महत्या, २७ वर्षांनंतर भाष्य, म्हणाले, “ही लढाई जिंकलो नाही कारण…”

दरम्यान देवोलिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे ती अधिक चर्चेत आली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसून आली होती. त्यानंतर ‘डान्स इंडिया डान्स २’ मध्येही दिसून आली. ‘छटी मय्या की बीटीया’ या मालिकेमध्ये दिसून आली होती.मात्र गरोदरपणामुळे मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Tags: baby boyDevoleena Bhattacharjeesocial media post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar, her husband Kunal Bhagat and Dhananjay Powar made a video call and wished Aarya Jadhao for her birthday

डीपी व अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्यासह आर्या जाधवला दिलं बर्थडे सरप्राइज, रॅपर खुश, म्हणाली, "जीजू आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.