बॉलिवूड अभिनेत्री स्नेह उल्लाल ही फार कमी लोकांना माहीत आहे. सलमान खानच्या ‘लकी- नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटांमध्ये ती दिसून आली होती. २००५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकून घेतली. या चित्रपटातून स्नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमानच्या ऐश्वर्या रायबरोबर ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाच तिच्यासारखीच दिसणारी अभिनेत्री म्हणून स्नेहा ओळखली जाऊ लागली. ऐश्वर्यासारखे डोळे, ओठ, नाक संपूर्ण चेहरापट्टी ही ऐश्वर्याच्या चेहऱ्याशी मिळती-जुळती होती. त्यामुळे स्नेहाबद्दल मनोरंजन क्षेत्रात कमालीच्या चर्चा रंगल्या. मात्र या चित्रपटाने स्नेहाला योग्य असे यश मिळाले नाही. त्यामुळे बॉलिवूड सोडून तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टिमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. (sneha ullal on salman khan)
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नाव कमवत असतानाच स्नेहाला गंभीर आजार झाला. या आजारामुळे ती अर्धा तासही उभी राहू शकत नव्हती. तिला नक्की काय झालं होतं? हे आपण आता जाणून घेऊया. स्नेहाचे शिक्षण मुंबईमधील एका कॉलेजमध्ये झाले. या कॉलेजमध्ये सलमानची बहीण अर्पिता खानदेखील शिकत होती. यावेळी सलमानची आणि स्नेहाची भेट झाली. सलमानने तिला ‘लकी’ या चित्रपटासाठी विचारणा केली. जेव्हा स्नेहाला प्रेक्षकांनी पाहिलं तेव्हा सगळेच जण बुचकळ्यात पडले.
आणखी वाचा – आजारपणामुळे अमोलचे गंभीर हाल, चालताही येईना अन्…; अवस्था बघून सर्वांनाच दु:ख अनावर
दरम्यान एका मुलाखतीदरम्यान स्वतः सलामानने देखील स्नेहाला पाहून गोंधळ उडाल्याचे सांगितले होते. ‘लकी…’ चित्रपट प्रदर्शित झाला मात्र त्याची जादू प्रेक्षकांवर चालू शकली नाही. त्यामुळे तिने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
२०१४ साली चित्रपट केल्यानंतर मनोरंजनसृष्टिपासून दूर झाली. याच वेळी तिच्या आजाराचे निदान झाले. तिला ऑटो इम्युन आजार होता. त्यामुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ण खराब झाली. यामुळे तिला अर्धा तासही एका जागी उभं राहता येत नव्हतं. मात्र आजारी असतानाही ती चित्रपटांचे शूटिंग करत राहिली. त्यामुळे तिची तब्येत अजून खालावली. नंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून ती दूर राहिली. यावेळी तिने सलमानचीदेखील मदत मागितली नाही. पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये सलमानची मदत घेण्याबद्दल ती म्हणाली की, “माझं आणि सलमानचं नातं कामपेक्षाही अधिक आहे. मी कामासाठी त्याला कधीही विचारणार नाही”. दरम्यान तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती २०२० साली एका वेबसिरिजमध्ये दिसून आली होती.