टेलिव्हिजनवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहू ही भूमिका अधिक लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र आता ती कोणत्याही भूमिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मॅटर्निटी फोटोशूटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या आनंदामध्ये चाहत्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान आता याबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Devoleena Bhattacharjee baby boy)
देवोलिना व शहनवाज हे आई-वडील झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. देवोलिनाने १८ डिसेंबर रोजी मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “१८ डिसेंबरला आमच्या आनंदाची पेटी, आमच्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे”. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, “हेलो वर्ल्ड! आमचा लाडका छोटा मुलगा इथे आहे. १८.१२.२०२४”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी व मित्रमंडळींनी आनंद व्यक्त करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान देवोलीनाने १५ ऑगस्ट रोजी एक भावुक पोस्ट लिहीत गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांचे मॅटर्निटी फोटोशूटदेखील चांगलेच व्हायरल झाले होते. या सगळ्या फोटोंमध्ये देवोलीनाचा प्रेग्नन्सी ग्लो बघायला मिळाला. डिसेंबर २०२२ मध्ये देवोलीनाने जिम ट्रेनर शानवाजबरोबर लग्न केले. त्यानंतर पंचामृत अनुष्ठानचे काही फोटोदेखील बघायला मिळाले. हे अनुष्ठान गर्भवती महिलांसाठी केले जाते.
दरम्यान देवोलिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे ती अधिक चर्चेत आली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसून आली होती. त्यानंतर ‘डान्स इंडिया डान्स २’ मध्येही दिसून आली. ‘छटी मय्या की बीटीया’ या मालिकेमध्ये दिसून आली होती.मात्र गरोदरपणामुळे मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.