बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थ याने १९९७ मध्ये आत्महत्या केली होती, या भयंकर दु:खाची सल आजही त्यांना आतून सतावत आहे. अभिनेते कबीर बेदी यांनी त्यांच्या आयुष्यात मुलाला गमावण्याच्या एका मोठ्या आव्हानाचा सामना केला आणि हा सामना ते अजूनही करत आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. सिद्धार्थने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. (Kabir Bedi on his son’s suicide)
सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. १९९० मध्ये त्याने कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि नंतर त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या २७ व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती. ‘डिजिटल कॉमेंटरी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “माझा मुलगा सिद्धार्थची खास गोष्ट म्हणजे तो खूप हुशार मुलगा होता. त्याने अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान झाले”.
कबीर बेदी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबाबत व्यक्त करत लिहिले आहे की, “सिद्धार्थच्या शेवटच्या महिन्यांबद्दल मी माझ्या पुस्तकात हे प्रकरण लिहिले आहे. एक बाप आपल्या मुलाला आत्महत्येपासून कसा रोखत होता याची कथा आहे. त्यावेळी माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. शेवटी मी ही लढाई जिंकू शकलो नाही आणि कदाचित ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी हार आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याने चप्पल घालून घेतले सात फेरे, ट्रोल होताच म्हणाली, “मंदिरात जातो तेव्हा…”
‘स्टोरीज आय मस्ट टेल’ मध्ये बोलत असताना, कबीर बेदींनी आधीच मुलगा गमावण्यापासून ते अपयश आणि दिवाळखोरी इत्यादी सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या मुलाला स्किझोफ्रेनियाचे निदान झाले तेव्हा तिला आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागला. त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश मिळालं नाही आणि याबद्दल त्यांनी स्वत:ला कायम दोषी मानले.