टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सध्या खूप चर्चेत आहे. स्तनांचा कर्करोग झाल्याचे तिने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर ती या रोगाचा सामना अत्यंत खंबीरपणे करत आहे. सध्या ती कर्करोगावर उपचार घेत आहे. ती आता सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय झालेली दिसून येत आहे. तसेच तिच्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांना देत आहे. अभिनेत्री या परिस्थितीमधून कशी जात आहे याबद्दलच्या भावना ती नेहमी शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे त्यामुळे ती अधिक चर्चेत आली आहे. (hina khan instagram post)
हिनाने पोस्ट करत लिहिले आहे की, “कधी ना कधी घालू शकेल अशी प्रत्येक मुलीकडे कमीत कमी एक जोड जीन्स असते. पण सध्या एक जोडी जीन्स नाही तर माझ्या कपाटातील आता प्रत्येक वस्तू अशीच आहे. यामधील काहीही मला होत नाही. पण ठीक आहे कारण सध्या आरोग्य व व्यवस्थित खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष देणे हे जास्त महत्त्वाचे आहे”. या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

याधीही हिनाने एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ती घरांमध्ये एका खिडकीच्या समोर बसून आहे. तसेच ती आकाशाकडे बघतानाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्टमध्ये ‘है ना”, असे कॅप्शन दिले होते. तसेच तिने आईबरोबरचेही काही फोटो शेअर केले असून दोघीही खूप भावनिक झालेल्या दिसून येत आहेत. तिच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला होता. तसेच ती लवकर बरी व्हावी अशी इच्छादेखील चाहते व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान हिनाने २८ जून रोजी स्तनाचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियामार्फत चाहत्यांना सांगितले होते. तिची ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिच्यासाठी लोक प्रार्थनादेखील करत आहेत.