‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या घरातील स्पर्धक अरमान मलिक व कृतिका मलिक जोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरमान-कृतिका एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये अरमान मलिक बेडवर झोपलेला दिसत आहे. मग कृतिका अचानक उठते आणि त्याच्या पोटाला हात लावते. अरमान मलिक आणि कृतिकाच्या या व्हिडिओवर काही लोक कृतिकाला वेडी महिला म्हणताना दिसत आहेत. यावर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय स्तरातूनदेखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
शिवसेना सचिव, प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना ‘बिग बॉस ओटीटी ३’ विरोधात तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. YouTuber आणि ‘बिग बॉस ओटीटी ३’ स्पर्धक अरमान मलिक व त्याची दुसरी पत्नी कृतिका यांचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मनीषा असं म्हणाल्या की, “‘बिग बॉस ओटीटी ३’ हा रिॲलिटी शो आहे. यात जे काही चालू आहे ते पूर्णपणे अश्लील आहे. यामध्ये स्पर्धकांनी अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जी दृश्ये दाखवली जात आहेत त्यावर कारवाई करण्याची विनंती आम्ही आता मुंबई पोलिसांना केली असून त्यांना पत्रही दिले आहे”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “रिॲलिटी शोच्या नावाखाली अश्लीलता दाखवणे कितपत योग्य आहे? याचा तरुणांच्या मनावर काय परिणाम होईल? आम्ही केंद्रातील माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडेही जाणार आहोत आणि आम्ही त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायदा आणण्याची विनंती करु. आम्ही त्यांना कलाकार आणि शोच्या सीईओलाही अटक करण्यास सांगितले आहे”.
दरम्यान, पहिली पत्नी पायलने हा अरमान-मलिक यांचा हा व्हिडिओ एडिट असल्याचा दावा केला होता. “ज्याने अरमान व कृतिकाचा व्हिडीओ शेअर केला आहे, मी त्यांना हात जोडून विनंती करतो की ते असे करणे थांबवा. मी ‘बिग बॉस’च्या घरात होते आणि मी सांगू शकते की, व्हायरल क्लिपमध्ये दाखवलेले दिवे घरात नाहीत. जे घरामध्ये आहेत त्यांना लगेच समजेल की, ही क्लिप बनावट आहे.