Ankita Lokhande Viral Video : टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर त अनेक हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अभिनयाला आजवर मोठ्या प्रमाणात पसंत केले गेले आहे. तिच्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. सध्या ती ‘बिग बॉस’मध्ये पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. यावेळी दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले की घराबाहेर येताच ते घटस्फोट घेतील अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. मात्र असे काहीही न होता दोघं आजही गुण्यागोविंदाने एकत्र रहात असल्याचे दिसून येत आहे.
विकी व अंकिता या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. सध्या दोघं ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहेत. यामध्ये यामध्ये दोघंही धमाल मस्ती करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच विकीचा वाढदिवस साजरा केला केला. विकीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली. पार्टीसाठी त्याच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. यावेळी अंकिताच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता ती लूकमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
अंकिताचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती विकीबरोबर दिसून येत आहे. यावेळी विकीचा मित्र संदीप सिंहदेखील सहभागी झाला होता. यावेळी संदीपने असे काही केले की अंकिता त्याच्यावर चिडलेली दिसली. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. अंकिताने यावेळी काळ्या रंगाचा शिमरी वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. पार्टीमधून बाहेर येताच अंकिता व विकीने पापाराजीना पोज देण्यास सुरुवात केली.
अंकिता व विकी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या मागे संदीपदेखील आला आणि अंकिताच्या ड्रेसला असलेली कॅप डोक्यावरुन खाली घेतली. संदीपच्या या कृतीमुळे अंकिताला खूप राग आला आणि तिने त्याच्याकडे रागात पहिले. लगेचच संदीपने पुन्हा तिची कॅप तिच्या डोक्यावर ठेवली. संदीप व विकी यावेळी हसताना दिसून आले. लगेच तिघांनी कॅमेरासमोर हसून पोज दिली. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला.