Actress Rejection : कलाकार मंडळी बरेचदा ट्रोलिंगबाबत बोलताना दिसतात. कलाकारांना सोशल मीडियावर सर्रासपणे ट्रोल केलं जात. बरेच कलाकार या ट्रोलिंगकडे चांगल्या हेतूने पाहतात तर काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. बरेच नवोदित कलाकार या ट्रोलिंगला घाबरतात. असं असलं तरी यावर मात करत ही मंडळी आपलं स्थान निर्माण करतात. आवाज, उंची, वजन या अशा अनेक समस्यांमुळे कलाकारांना भूमिकेला मुकावे लागले आहे. अशातच आता समोर आलेल्या एका मुलाखतीत मराठी अभिनेत्रीने तिच्या आवाजामुळे तिला नकार ऐकावा लागला असल्याचं सांगितलं. आणि आवाज हा तिच्यासाठी कलेतील जमेची बाजू दिसणार की हाच आवाज रिजेक्शनच कारण ठरणार या द्विधा मनस्थितीत ती अडकली. ही अभिनेत्री म्हणजे कादंबरी माळी.
कादंबरीने नुकतीच ‘इट्स मज्जा मराठी’च्या ‘रोल, कॅमेरा, गप्पा’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी बोलताना कादंबरी म्हणाली, “नका करू ट्रोलिंग. नाही झालं पाहिजे ट्रोलिंग कोणाचं. कारण जेव्हा When Went Through in This तो इतका मोठा ट्रॉमा बसतो ना डोक्यात. त्याचा कामावर परिणाम होतो. थिएटर करत होते तेव्हा असं झालं की हा आवाज माझ्या ऍक्टिंगसाठी कॉम्प्लिमेंट करतोय. असं होतं ते की खूप चांगला आवाज लागतो. त्याच्यानंतर मी डबिंगसाठी पण काम केलं. मी व्हॉइस ओव्हरसाठी काम केलं. पण मालिकांमध्ये जेव्हा काम करायला लागले. तेव्हा असं झालं की कादंबरी पुरुषी आवाज येतोय. हे कदाचित असं झालं की त्या दिग्दर्शकांची सांगण्याची पद्धत Maybe तेवढी ती खूप वेगळी असेल. म्हणून ते मला लागलं असेल”.
आणखी वाचा – “पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने मांडली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”
शेवटी कादंबरी म्हणाली, “पण मालिकांसाठी तुझा आवाज कधीच जाणार नाही. इतका Base असणारा आवाज किंवा पुरुषी ऐकायला येणारा म्हणजे सर्वसाधारण मुलींचा असा आवाज नसतो. त्यामुळे मुलींच्या आवाजाच्या कॅटेगरीमध्ये तुझा आवाज येत नाही. हे जेव्हा मला सतत ऐकावं लागलं तेव्हा असं झालं की आपण बहुतेक नाही करु शकणार. आणि तेव्हा त्रास झाला”.




