बॉलिवूड सिनेसृष्टीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या कुटुंबामध्ये बच्चन कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं. बरेचदा हे कुटुंब त्यांच्यातील वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असतं. आपापसातील वाद, ऐश्वर्या-अभिषेकमधील घटस्फोटाच्या चर्चा यांमुळे हे कुटुंब कायम लक्ष वेधून घेत असतं. तर एकीकडे अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही. कायमच ती अभिनयापासून दूर राहिली. आणि असं असलं तरी बॉलिवूडमध्ये तिचे अनेक मित्र आहेत. ती तिच्या आई-वडिलांबरोबर अनेकदा चित्रपटाच्या सेटवर जायची त्यामुळे तिचे बरेच कलाकार मित्र आहेत. (Shweta Bachchan Crush)
चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर श्वेताला कुणीतरी आवडू लागलं होतं. आणि श्वेताला आवडणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तिची वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड होता. सेटवर ओळख झाल्यानंतर श्वेताला सलमान खान आवडू लागला होता आणि तिनेच एकदा याचा खुलासादेखील केला होता. श्वेता बच्चनने यापूर्वीही अनेक पॉडकास्ट शोमध्ये खुलासे केले आहेत. अशातच एकदा ती करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये गेली होती जिथे तिने सलमान खान आवडत असल्याचे उघड केले.
श्वेताने सांगितले होते की, ती अनेकदा अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्याबरोबर सेटवर जायची, त्यानंतर ती सलमानची फॅन झाली. करणने त्याच्या शोमध्ये श्वेताला हॉटनेसनुसार कलाकारांची रँक करण्यास सांगितले होते, ज्यामध्ये तिने सलमानचे नाव पहिले घेतले. तिला सलमानची इतकी मोठी चाहती होती की, ‘मैने प्यार किया’ मधील अभिनेत्याची टोपी कायम ती तिच्या जवळ ठेवायची आणि ती टोपी घेऊन झोपायची. ही टोपी श्वेतासाठी तिचा भाऊ अभिषेकने आणली होती.
आणखी वाचा – “तिथे शांत बसू नकोस”, पॅडीसाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “तुझ्या माणसांच्या मदतीसाठी…”
श्वेताची वहिनी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या रायने सलमान खानला डेट केले आहे. दोघेही जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नाते अत्यंत वाईट पद्धतीने संपुष्टात आले. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनला डेट केले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या व अभिषेक सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. हे जोडपे वेगळे होणार असल्याच्या अनेक चर्चा आहेत. मात्र, अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्याने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. घटस्फोटाच्या वृत्तावर दोघांनी मौन पाळले आहे.