Neha Bhasin viral post : ‘स्वॅग से स्वागत’ या गाण्यामुळे अभिनेत्री व गायिका नेहा भसीन ही अधिक लोकप्रिय झाली. वेगळा आवाज, कणखरता यामुळे तिला अनेक गाणी गाण्याची संधीदेखील मिळाली. सध्या नेहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिला अनेकदा एअरपोर्ट, जिम या ठिकाणी स्पॉट केले जाते. त्याचप्रमाणे तिने फिटनेसचीही अधिक काळजी घेतलेली दिसून येते. तिच्या फिटनेसची चर्चादेखील अधिक प्रमाणात होताना दिसते. आशातच आता तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमुळे अनेकांना धक्कादेखील बसला आहे.
तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रीमॅन्स्ट्रूअल डिस्फोरिक डिसऑर्डर, ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनॅलिटी डिसऑर्डर व फायब्रोमायल्जिया अशा मानसिक तसेच हार्मोनल समस्यांवर भाष्य केले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला खूप काही सांगायचे आहे.पण नक्की सुरु कुठून करु हे मला सांगता येत नाही आहे. मला खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबद्दल मला सांगतानाही त्रास् होत आहे. हे सगळं माहीत पडल्यानंतर अखेर माझे उपाचार झाले आणि माझी या नरकातून सुटका झाली. जेव्हा मी २० वर्षांची होते तेव्हा मला याची माहिती मिळाली आणि वेळेवर उपचार घेऊ शकले”.
पुढे तिने लिहिले की, “मानसिक थकवा, शारीरिक दुखणं, नैराश्य, चिंता, झोपेची आवश्यकता हे सगळं काही ठीक झालं. कॉग्निटीव्ह थेरपी, योगासने, तणाव कमी करण्यासाठी अधिक काम न करणे, ज्या लोकांवर मी प्रेम करते त्यांना भेटणे हे सगळं मी करत होते. हे सगळं आरामदायक वाटत होतं. पण याच आरामामुळे तुम्ही किती थकला आहात हे समजून येते. मी सध्या यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. स्वतःवर लक्ष देत आहे. डान्स, व्यायाम हे सगळं करत आहे”.
नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लवकरच बरी व्हावी असेही चाहत्यांनी म्हंटले आहे. नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले आहे. तिच्या अनेक गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.