शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही घरातील कामं…”, लग्नानंतर असं बदललं आहे सुरुची अडारकरचं आयुष्य, म्हणाली, “माझा नवरा पियुष…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 11, 2024 | 1:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suruchi Adarkar Piyush Ranade Marriage

"आम्ही घरातील कामं…", लग्नानंतर असं बदललं आहे सुरुची अडारकरचं आयुष्य, म्हणाली, "माझा नवरा पियुष…"

Suruchi Adarkar Piyush Ranade Marriage : सर्वत्र सध्या लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळाले. अशातच मनोरंजनविश्वात सुद्धा अनेक जोडपी विवाह बंधनात अडकली. प्रथमेश-मुग्धा, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद या जोडींनी लग्नगाठ बांधली. याशिवाय आणखी एक कलाकार जोडी त्यांच्या शाही लग्नसोहळ्याने चर्चेत आली. ती जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे. कोणताही गाजावाजा न करता, कोणालाही बारीकशी हिंट लागू न देता या जोडीने लग्न केलं.

लग्नानंतर सुरुचीचं आयुष्य कसं बदललं आहे याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. लग्नानंतर सुरुची छोट्या पडद्यावर परतली आहे. सुरुची अडारकरने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून सिनेविश्वात कमबॅक केलं आहे. या मालिकेत तिची नागीणची भूमिका असलेली पाहायला मिळत आहे. या भूमिकेबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुरुची म्हणाली, “माझा लूक मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. मी अशी भूमिका कधीच साकारली नाही” असं ती म्हणाली.

आणखी वाचा – “लोकांवर दादागिरी…”, नीतू कपूर यांचा ऋषी कपूर यांच्याबाबत पहिल्यांदाच खुलासा, म्हणाल्या, “ते स्वतःच्या मुलांशी कधीही…”

लग्नानंतर आयुष्यात आलेल्या बदलांबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “लग्नानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी मी माझे शूट संपवून घरी जायचे तेव्हा आई सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. आता ती जबाबदारी माझी मला सांभाळावी लागत आहे. माझा नवरा पियुष माझा खूप मोठा आधार आहे. आम्ही घरातील कामं वाटून घेतो. मी घरातील सामान आणते आणि इतर कामं बघते. बाकीची कामं पियुष बघतो. मी सध्या माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हा आयुष्यातील सर्वात चांगल्या टप्प्यांपैकी एक आहे. मला ही मालिका लगेच मिळाली, हा मी एक आशीर्वाद समजते” असंही ती म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – पारंपरिक लूक, काळ्या रंगाची पैठणी अन्…; राणादा व पाठक बाईंची मकरसंक्रात असणार खास, नवऱ्याच्या शोमध्ये अभिनेत्रीची एंट्री अन्…

लग्नाबाबत भाष्य करताना ती म्हणाली, “मी प्रचंड आनंदी आहे. या क्षणाला मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही. मला हे सगळंच स्वप्नवत वाटतं आहे. खरं सांगायचं झालं, तर माझ्या मनात एक वेगळीच जादुई भावना निर्माण झाली. पियुष माणूस म्हणून खूपच चांगला व्यक्ती आहे. अतिशय भावनिक, काळजी घेणारा आहे. मी खरंच भाग्यवान आहे म्हणून मला पियुषसारखा जोडीदार लाभला” असंही ती म्हणाली.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressPiyush RanadeSuruchi AdarkarSuruchi Adarkar And Piyush Ranade LovestorySuruchi Adarkar Piyush Ranade Marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Premachi goshta serial fame actress apurva nemlekar shared reality check post on Instagram story

"सहकलाकार, सहकारी तुमचा…", 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरला कोणाशीच करायची नाही मैत्री, म्हणाली, "तुमचा कुणीही मित्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.