Koffee With karan 8 : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’चा नवा भाग समोर आला आहे. यावेळी नीतू कपूर व झीनत अमान यांनी या शोला हजेरी लावली. यावेळी नीतू कपूर तिच्या कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना दिसल्या. यावेळी नीतू कपूर यांनी ऋषी कपूरबद्दलही भाष्य केलं. नीतू कपूर यांनी ‘कॉफी विथ करण ८’ मध्ये ऋषी कपूरबद्दल अनेक खुलासे केले. नीतू कपूर यांनी सांगितले की, “ऋषी कपूर खूप कडक शिस्तीचे होते. त्यांनी कधीही रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करु दिल्या नाहीत”.
नीतू कपूरने करण जोहरला सांगितले की, “ऋषी कपूर खूप कडक शिस्तीचे प्रियकर होते. उशिरापर्यंत त्यांनी मला कधीही पार्टी करु दिली नाही”. यापुढे त्या म्हणाल्या, “जेव्हाही आम्ही यश चोप्रायांच्यासह शूटिंग करायचो तेव्हा ते रात्री उशिरा पार्ट्या करायचे. मात्र, ऋषी कपूर यांच्या निर्बंधांमुळे त्यांनी कधीही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली नाही” असं त्या म्हणाल्या.
नीतू कपूर यांनी असंही सांगितले की, “आम्ही यशजींसह खूप छान वेळ घालवला आहे. रात्रीच्या आम्ही पार्टी करायचो. अंताक्षरी खेळायची, जणू ती एक पिकनिकच असायची. खूप मजा आली पण माझे प्रियकर ऋषी कपूर होते, त्यामुळे मी कधीही अशी पार्टी केली नाही. कारण ते नेहमी म्हणायचे, “असं करु नको, घरी ये” असं ते म्हणायचे.
नीतू कपूर यांनी शोमध्ये सांगितले की, “ऋषी कपूर यांची मुले रणबीर-रिद्धिमा यांच्याशी त्यांची कधीच मैत्री झाली नाही. आयुष्यात खूप दिवसांनंतर ते मुलांशी जोडले गेले नाहीत. कारण ते खूप गोड होते .त्यांच्या मनात खूप प्रेम होतं पण त्यांनी ते प्रेम कधीच लोकांना दाखवलं नाही. ते नेहमी अंतर राखून लोकांवर दादागिरी करत असत” असंही त्या म्हणाल्या. २२ जानेवारी १९८० रोजी नीतू कपूर व ऋषी कपूर यांचं लग्न झालं. लग्नानंतर नीतू या अभिनयक्षेत्रापासून दूर गेल्या.