स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ सारखी मालिका किंवा ‘बिग बॉस मराठी’ ४ मध्ये खेळलेल्या विविध टास्कद्वारे स्वतःचं वैशिष्ट्य दाखवून दिलं आहे. अपूर्वानं मालिकांमध्ये काम करत तिनं प्रेक्षकांच्या मनावर खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Apurva Nemlekar On Instagram)
अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हॅशटॅग ‘रियालिटी चेक’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे आणि अपूर्वाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असे म्हटले आहे की, “२०२४ या वर्षात मी हे निश्चित केले आहे की, सहकारी, वर्गमित्र, सहकलाकार, शेजारी, ग्राहक किंवा तुमच्या ओळखीचा कुणीही माणूस यांपैकी कुणीही तुमचा मित्र नाही.” अपूर्वा नेहमीच तिच्या सोशल मीडियाद्वारे काहीना काही शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी नेहमीच आपले विचार वा मत मांडत असतात. अभिनेत्री अपूर्वाही सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेली ही पोस्ट नक्की कुणासाठी आहे? किंवा कुणासंदर्भात आहे, याबद्दल तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.