‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय शो जाऊ बाई गावात हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या कार्यक्रमाने अल्पावधीतच साऱ्यांची मन जिंकली आहेत. स्पर्धकांचा खेळही प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वांचा लाडका राणादा म्हणजेच हार्दिक जोशी सांभाळत आहे. प्रेक्षक या कार्यक्रमावर जितके प्रेम करत आहेत तितकंच प्रेम ते हार्दिकला देत आहेत. जाऊ बाई गावात या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. (Hardeek Joshi And Akshaya Deodhar)
आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात एका खास कलाकाराची एंट्री होताना पाहायला मिळणार आहे. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडेने पोस्टमन काकांच्या रुपात एन्ट्री घेतली होती. हा भाग प्रेक्षकांसाठी खूपच भावनिक ठरला. त्यानंतर आता कार्यक्रमात मकर संक्रांती स्पेशल भाग होणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक हार्दिक जोशीला ‘जाऊ बाई गावात’च्या टीमकडून एक खास सरप्राईज मिळणार आहे.
१४ तारखेला मकरसंक्रांत साजरी करण्यात येते. वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात हार्दिकची पत्नी अक्षया देवधर हजेरी लावणार आहे. हार्दिक व अक्षयासाठी यंदाची मकरसंक्रात खास असणार आहे. अक्षया यावेळी पारंपरिक अंदाजात हजेरी लावणार आहे. इतकंच नव्हे तर तिचा संक्रांती स्पेशल लूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. अक्षयाने यावेळी काळी पैठणी साडी नेसलेली पाहायला मिळाली. तिळगुळाचा गोडवा घेऊन पाठकबाई लवकरच या शोमध्ये येणार आहेत.
अक्षय देवधर व हार्दिक जोशी यांनी २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकला. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम रानादा व पाठक बाई या जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.