अभिनेत्री सुरुची अडारकर व पियुष रानडे ही जोडी त्यांच्या लग्नानंतर चांगलीच आली चर्चेत आहे. सुरुची-पियुष यांच्या लग्नाच्या अचानक आलेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा रंगल्या. सुरुची-पियुष यांच्या लग्नावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. सुरुची-पियुष यांच्या रिलेशनबद्दल याआधी कुणालाही माहिती नव्हती. मात्र लग्नाच्या फोटोमुळे त्यांच्या नात्याविषयी सर्वानाच माहिती झाली. (Suruchi Adarkar On Instagram)
अशातच सुरुची-पियुष यांच्या लग्नाच्या, रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांच्या लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. सुरुचीने लग्नानंतर तिच्या कामाला सुरुवातदेखील केली आहे. मात्र आपल्या कामातून वेळ काढत ही जोडी पहिल्यांदाच फिरायला गेली आहे.

सुरुची ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरून ती आपल्या नवऱ्यासह फिरायला गेली असल्याचे कळत आहे. सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पियुषचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच एक व्हिडीओद्वारे तिने पुढच्या दोन दिवसांसाठी हे यांचे घर असल्याचेदेखील म्हटले आहे.

दरम्यान, सुरुची-पियुष हे कोणत्या ठिकाणी फिरायला गेले आहेत. याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. पण ते दोघे कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करण्यासाठी गेले असल्याचे या फोटो व व्हिडीओद्वारे कळत आहे.
