Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’मध्ये सध्या फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यानिमित्त स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीस आले आहेत. अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या आई देखील दोघांना भेट द्यायला ‘बिग बॉस’च्या घरात आल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता लोखंडेची सासू विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात केलेल्या वक्तव्यांमुळे व घरातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमुळे विकीची आई चर्चेत आली आहे.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, विकीच्या आईने अंकिता व सुशांत सिंग राजपूत बद्दल भाष्य केलं. अंकिताने शोमध्ये दिवंगत माजी प्रियकर सुशांत सिंग राजपूतचा नियमित उल्लेख करण्याबद्दल विचारले असता, ती म्हणाली, “अंकिता स्वतःच्या सहानुभूतीसाठी हे सर्व करत आहे. सुशांतचा याच्याशी काय संबंध. तो तर निघून गेला. तो होता तेव्हा त्याला भरपूर प्रेम मिळालं. त्याने किती चांगली कामे केली आहेत” असंही त्या म्हणाल्या.
अंकिताने विकीला लाथ मारल्यानेही ती ट्रोल झालेली पाहायला मिळाली. नवऱ्याला लाथ मारताना पाहून तिचं कुटुंब दुखावल्याचेही विकीच्या आईने या मुलाखतीदरम्यान नमूद केले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या “आपण भारतात राहतो, जिथे पत्नीला देव मानले जाते. आणि तिचा नवरा खरंच देव आहे.
आणखी वाचा – लेकीच्या लग्नासाठी आमिर खानने काढली हातावर मेहंदी, साध्या लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
झूमला दिलेल्या एका वेगळ्या मुलाखतीत, अंकिताच्या सासू-सासऱ्यांनी असंही म्हटलं की, “विकीने अंकिताशी लग्न करावे अशी आमची कधीच इच्छा नव्हती. आमचा या लग्नाला पाठिंबा नव्हता. आता त्याची लढाई त्यालाच लढायची आहे, आमचा याच्याशी काही संबंध नाही. प्रत्येकजण काय घडतंय ते पाहत आहे परंतु आम्ही याबद्दल काहीही बोलत नाही. तो जेव्हा बाहेर येईल तेव्हाच तो सर्व सुधारेल. त्याने काही चुकीचं केलं असेल तर तो ते नक्की सुधारेल. आम्हाला खात्री आहे की, विकीने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत” असंही त्या म्हणाल्या आहेत.