स्टार प्रवाह वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तब्बल दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्याच्या काळात विलोप होत चालली एकत्र कुटुंब पद्धती अगदी उत्तम दाखवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात सुद्धा एकत्र कुटुंबपद्धतीबद्दल आपुलकी निर्माण झाली होती. (Actress Namarta Pradhan Shared Vacation Photos)
मालिकेत एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात आली होती. त्यामुळे मालिकेत अनेक कलाकारांची फौज होती. पडद्यावर ज्याप्रमाणे हे कलाकार एखाद्या कुटुंबासारखे राहत होते. तसेच पडद्यामागेदेखील ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. अशात मालिका संपल्यामुळे हे कलाकार खऱ्या आयुष्यात एकत्र फिरायला गेले आहेत. हिवाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हे कलाकार फिरायला गेले आहेत.
आणखी वाचा – प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, “तुला नाही येत…”
अभिनेत्री सुप्रिया पाठारे, त्यांचं कुटुंब त्याचबरोबर, अभिनेत्री नम्रता प्रधान, ज्ञानदा रामतीर्थकर, तन्वी बर्वे व सई कल्याणकर हे कलाकार फिरायला गेले आहेत. दरम्यान हे सर्व कलाकार नेमके कुठे फिरायला गेले आहेत हे कळलं नसलं तरी ते या सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसत आहे. कलाकारांनी त्यांचे धम्माल, मस्तीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोखाली अभिनेत्रींनी ‘आनंदी क्षण, प्रवास, सुट्टी, प्रवास, सदैव एकत्र’ असे हॅशटॅग लिहीत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
दरम्यान, कलाकारांनी शेअर केलेल्या या फोटोखाली चाहत्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर या फोटोत मालिकेतील बाकीचे कलाकार दिसत नसल्यामुळे काही चाहत्यांनी हे कलाकार कुठे आहेत? असा प्रश्नही विचारला आहे.