मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2026 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bhootam Bhayam

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

Bhootam Bhayam : ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ निर्मित ‘भूतम भयम्’ हा बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचा भन्नाट संगम असलेल्या या चित्रपटाचं सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच आता प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज समोर आलं आहे. चित्रपटात आधीच दमदार कलाकारांची फौज असताना आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या चित्रपटात ‘मया’ ही अतिशय वेगळी आणि रहस्यमय भूमिका साकारत आहे.

चित्रपटातील ‘मया’ हा विचित्र स्वभावाचा, अनाकलनीय आणि प्रेक्षकांना सतत संभ्रमात ठेवणारा आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीमागे एक गूढ दडलं असून तो कथेला अनपेक्षित वळण देतो. हा मया नेमका कोण आहे? त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तो नेमकं काय करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

आणखी वाचा – “मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

याविषयी प्रियांदर्शन जाधव म्हणाला, “‘भूतम भयम्’चा भाग होणं हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी अनुभव होता. ‘मया’ ही व्यक्तिरेखा पहिल्यांदा ऐकली तेव्हाच तिचं वेगळेपण मला खूप भावलं. वरकरणी साधा वाटणारा हा माणूस प्रत्यक्षात अनेक रहस्यांनी भरलेला आहे. या भूमिकेचा स्वभाव, त्याची देहबोली, संवादफेक आणि त्यामागचं गूढ जपणं हे माझ्यासाठी कलाकार म्हणून मोठं आव्हान होतं. अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारताना प्रत्येक प्रसंगात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांना ‘मया’ नक्कीच आश्चर्याचा धक्का देईल आणि चित्रपट संपल्यानंतरही ही व्यक्तिरेखा त्यांच्या लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.’’

आणखी वाचा – “कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

रामचंद्र अरुण गांवकर लिखित आणि दिग्दर्शित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम, पुष्कराज चिरपुटकर, छाया कदम, प्रियदर्शन जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Tags: Bhootam Bhayammarathi movieMarathi Movie.priydarshan jadhav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, "घटस्फोट दे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.