रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूने आईला बोलूच दिलं नाही, दोघींमध्ये वादाची ठिणगी, म्हणाली, “तुम्ही अशा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2023 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूने आईला बोलूच दिलं नाही, दोघींमध्ये वादाची ठिणगी, म्हणाली, “तुम्ही अशा…”

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. एकापेक्षा एक असलेल्या स्पर्धकांनी हा शो अधिक उठावदार केला आहे. या शोमधील अंकिता लोखंडे व विकी जैनही जोडी विशेष चर्चेत असते. अशातच ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विकी व अंकिताच्या आईने ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली होती. विकी व अंकिता दोघांच्या आईंना समोर पाहून भावुक झालेले दिसले.

यावेळी विकी अधिक भावुक झालेला दिसला. ‘प्रत्येकजण खूप गैरसमज करून घेतो’ असं तो रडत म्हणताना दिसला. यावेळी विकीला रडताना पाहून त्याची आईही भावूक झाली. विकीची आई त्याला समजावू लागते, ‘सगळे खेळायला आले आहेत बेटा. ही आपली माणसं नाही आहेत. हे घर आपलं नाही. हे ‘बिग बॉस’चे घर आहे”. मग अंकिताची आई बोलण्याचा प्रयत्न करते पण विकीची आई तिला गप्प करते.

विकीची आई म्हणते, “टाळी एका हाताने कधीच वाजवता येत नाही. जे घडले ते विसरून जा, पती पत्नीच्या नात्यात अशी भांडण होतात, असे उतार चढाव येतात, आता गोष्टी सुधारण्याची वेळ आली आहे. तुमच्या नात्यावर काम करा. एकत्र वेळ घालवा. भांडणे टाळा. बाहेर तुम्ही दोघे खूप प्रेमाने राहत होता आणि घरात, अंकिता विकीवर चप्पल फेकत आहे आणि त्याला लाथ मारत आहे.” विकीच्या आईचं बोलून झाल्यावर ‘बिग बॉस’ अंकिताच्या आईला प्रश्न विचारतात.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीची नवी हेअर आर्टिस्ट पाहिलीत का? अभिनेत्रीला दिले केस विंचरायचे धडे, म्हणाली, “तुला नाही येत…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अंकिता व विकीचे प्रेम दिसत नसल्याचे अंकिताच्या आईचे म्हणणे आहे. अंकिताची आई म्हणते, “विकीने त्याची मजेशीर बाजू बाहेरच्या जगाला दाखवावी. अंकिता भावूक होते. ती सर्व दोष स्वत:वर घेते आणि म्हणते माझ्यामुळे विकीवर दबाव येतो कारण तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय असे मला वाटते”. याचवेळी विकीची आई मध्येच बोलते की, “तिने विकीला तिच्यासाठी खेळायला पाठवले आहे कारण तो खूप परिपक्व आहे.पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत”.

आणखी वाचा – खाण्यापिण्यापासून मालिका पाहण्यापर्यंत, अल्का कुबल त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंचे पुरवतात लाड, म्हणालेल्या, “तेवढा विचार…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावेळी ‘बिग बॉस’ विकीच्या आईला थांबवतात व म्हणतात, ‘विक्कीच्या आई, अंकिताच्या आईला प्रश्न विचारला आहे, तिला बोलू द्या.’ यानंतर अंकिताची आई म्हणते, ‘विकीसारखा माणूस शोमध्ये रडू शकतो, तर ती समजू शकते की आतमध्ये किती दडपण आहे.’ इतकं बोलल्यानंतर दोघेही अंकिता व विकीला निरोप देत ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडतात. तेव्हा अंकिताची आई तिची नाराजी व्यक्त करते. ती विकीच्या आईला म्हणते, ‘तुम्ही अशा पद्धतीने बोलत होतात की मला काही बोलूही दिलं नाहीत”, त्यांचा हा संवाद कॅमेऱ्यात कैद झालेला पाहायला मिळाला.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17Bigg Boss 17 marathi newsBigg Boss marathi newsentertainmentsalman khanvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss 17 orhan awatramani aka orry leave salman khan show in only one day

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'मधून ओरीचा काढता पाय, फक्त एका दिवसातच घरातून पडला बाहेर कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.