बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र बॉलीवूड बॉयकॉट प्रकरणाचा सामना करावा लागल्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला होता. पण जेव्हा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, तेव्हा याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशातच ‘RRR’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमिरच्या चित्रपटातील अभिनयाबद्दल पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना आमिरचा भाऊ मन्सूर खानने सांगितलं की, आमिरने चित्रपटात ओव्हरॲक्टिंग केली असून राजमौलींनीही आमिरच्या अभिनयावर शंका व्यक्त केली आहे. (ss rajamouli on aamir khan acting in laal singh chaddha)
मन्सूर खानने पीटीआईला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “एक दिवस मी व आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाबाबत बोलत होतो. तेव्हा आमिरने मला हसत म्हटलं की, “जेव्हा तू (मन्सूर) मला सांगितलंस की चित्रपटामध्ये ओव्हर ॲक्टिंग केली आहे तेव्हा त्याकडे मी दुर्लक्ष केलं. पण राजामौली यांच्यासारख्या वक्तीनेही मला ओव्हर ॲक्टिंग केली आहे म्हटलं तेव्हा मीही गंभीर झालो”. आमिरला तेव्हा विश्वास बसला होता”. बॉयकॉट प्रकरण सुरु असतानाही आपला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार असा विश्वास आमिरला होता असंही मन्सूरने म्हटलं. पण जेव्हा चित्रपट फ्लॉप ठरला तेव्हा आमिरला मोठा धक्का बसला, असंही त्याने सांगितलं.
हे देखील वाचा – “चित्रपटसृष्टी जिवंत राहण्यासाठी…”, सुबोध भावेचा दादासाहेब फाळकेंना भावनिक फोन, म्हणाला, “फक्त पुरस्कार महत्त्वाचे नाहीत तर…”
“मला या चित्रपटाची कथा आवडली. अतुल कुलकर्णी यांनी उत्तम लेखन केले आहे. पण मला असं वाटतं की, आमिरचे हे पात्र डिस्लेक्सिया किंवा इतर कशानेही पीडित नव्हता, तर थोडा विचित्र होता. त्यापेक्षा मला मूळ चित्रपटातील टॉम हँक्स आवडला होता. अभिव्यक्ती आणि पात्राच्या चित्रणात आमिर खूपच कमी होता. अर्थात मी हे सगळं आमिरला सांगितले होते.”, असं मन्सूर खान म्हणाला.
हे देखील वाचा – Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपट प्रसिद्ध हॉलीवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक होता, ज्यात टॉम हँक्स यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेक अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केले होते. करीना कपूर आणि मोना सिंग हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर मन्सूरबाबत बोलायचं झाल्यास, त्याने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. (ss rajamouli on aamir khan acting in laal singh chaddha)