मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशी अनेक चित्रपट त्याची गाजलेली आहेत. शिवाय त्याने अनेक नाटक व मालिकाही केल्या आहे. सुबोध भावे विविध मुद्द्यांवरून सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त होत असून त्याची चर्चा नेहमीच होत असते. हाच अभिनेता संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या आगामी भागात आपल्याला दिसणार आहे. (subodh bhave in khupte tithe gupte)
अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात आजवर अनेक मान्यवर आले होते. अनेकांनी त्याच्या खुपणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या नव्या भागात अभिनेता सुबोध भावे दिसणार असून यामध्ये त्याने अवधूतला खुपणाऱ्या विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली आहे. या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात सुबोध भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना भावनिक फोन लावताना मराठी चित्रपटांबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा – “तुम्हाला बळजबरी…”, राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करणाऱ्यावरुन सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “कुठल्या भूमिका करायच्या…”
सुबोध भावे म्हणाला, “नमस्कार दादासाहेब, ११० वर्षांपूर्वी १९१३ साली तुम्ही “राजा हरिश्चंद्र” या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, निर्मिती करत भारतातील पहिल्या चित्रपटाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवली. दरवर्षी तुमच्या नावाने केंद्र सरकारकडून चित्रपटसृष्टीत योगदान दिलेल्या अनेक कलाकारांना आजही सन्मानित केलं जातं. पण ज्या मातीत तुमचा चित्रपट झाला, तिथे फार सध्याची परिस्थिती बरी नाही. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारांना सुरुवात झाली, तेव्हा त्यातील पहिली दोन वर्ष मराठी चित्रपटांनीच पुरस्कार मिळवला होता. पण केवळ पुरस्कारच महत्वाचे नाहीत, तर आपली चित्रपटसृष्टी जिवंत राहण्यासाठी, त्याचा व्यवसाय म्हणून विचार होणं, त्यादृष्टीने पाऊलं टाकणं हे महत्त्वाचे आहे.”
हे देखील वाचा – …म्हणून बायकोला सुबोध भावेने रक्ताने लिहिलं पत्र, म्हणाला, “मी सिगारेट ओढत असताना…”
येत्या रविवारी!! बालगंधर्वांपासून डॉक्टर काशिनाथ घाणेकरां पर्यंत .. सगळ्यांना काय काय ‘खुपते’ ते पाहुया!! #khuptetithegupte @zeemarathi @ZEE5India @ZEE5Marathi @SubodhBhave_FC #subodhbhave @mataonline @LoksattaLive @lokmat @SakalMediaNews @pudharionline pic.twitter.com/DqkN4UuMYN
— Avadhoot Gupte (@AvadhootGupte) August 16, 2023
“मी तक्रारीसाठी फोन केला नसून तुमच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला हा फोन केला होता. काय करावं आम्ही, ज्या मातीत तुम्ही ज्या उद्देशाने या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. त्या मातीत पुन्हा एकदा त्याच उद्देशाने मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार होईल, की उद्या भारतीय चित्रपटाचा जेव्हा विचार कराल तेव्हा मराठी चित्रपटांचं सगळ्यात पहिल्यांदा विचार करावा लागेल.”, असं सुबोध भावे म्हणाला. (subodh bhave in khupte tithe gupte)