आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. छोट्या पडद्यातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारी प्राजक्ता माळी केवळ उत्तम अभिनेत्री नव्हे, तर ती उत्तम सूत्रसंचालिका, कवयित्री, नर्तिका व यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. शिवाय सोशल मीडियावरही प्राजक्ताची जादू कायम असून तिच्या फोटोशूट्स व व्हिडीओजची अनेकदा चर्चा होत असते. (prajakta mali new movie)
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच मोठं फार्महाऊस खरेदी केलं असून तिथेच तिने आपला वाढदिवस साजरा केला होता. ही गोड बातमी देऊन काही दिवसच झाले नाही, अशातच आणखी एक गोड बातमी प्राजक्ताने दिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या नव्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे.
हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटात प्राजक्ता माळीसह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी व अन्य कलाकार दिसणार आहे. प्राजक्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. ज्यामध्ये तीन अंक दर्शवणारा एका हातात बेडी व स्माईली दिसत आहे. ‘दुनिया गेली तेल लावत’ अशी टॅगलाईन असलेल्या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
हे देखील वाचा – Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”
प्राजक्ताने हा पोस्टर शेअर करताना लिहिलंय, “Our next…???? हे तीन जण तर मजबूत अडकलेत! आणि आता तुम्हालाही अडकवायला येतायत! कोण? कधी? कुठे? कसे? कळेलच!” येत्या २९ सप्टेंबरपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “त्याचं डोकं फाटलं, माझ्या डोक्याला…”, एकदा नव्हे तर दोनवेळा मानसी नाईकला मृत्यूने गाठलं, म्हणाली, “मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर…”
याआधी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ताचा ‘प्राजक्तराज’ नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या फार्महाऊसवर हास्यजत्रेतील कलाकारांसोबत वाढदिवस साजरा केला होता. आता प्राजक्ताच्या या नव्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. (prajakta mali new movie)