छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय ठरलेला आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हा विनोदी कार्यक्रम आज महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना मनसोक्त हसवतात. त्यामुळे या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. नुकताच चाहत्यांच्या प्रेमामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली. या नव्या पर्वाच्या परिक्षणाची धूराही अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री सई ताम्हणकर सांभाळत आहे. प्रसाद नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडिओ शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.(Prasad Oak Shared A Funny Video)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर प्रसाद व सई परिक्षणासह मजा-मस्तीही करताना दिसतात. आताही प्रसादने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओमध्ये प्रसाद चाहत्यांना म्हणतो, ”नमस्कार, मी हास्यजत्रेच्या सेटवरुन तुम्हा सगळ्यांशी बोलत आहे आणि इथे सेटवर माझ्या शेजारी नक्की काय चाललंय हे मला कळत नाही. तुम्हाला कळालं असेल तर मला समजावून सांगा”, असं म्हणत प्रसादने कॅमेरा शेजारी बसलेल्या सईकडे फिरवला.
वाचा – हास्यजत्राच्या सेटवर नेमकं काय घडलं?(Prasad Oak Shared A Funny Video)
पुढे सईने तिच्या हातातील फोटो दाखवत म्हणाली, “हे आमचे महाबळेश्वर काका आहेत, त्यांच्याकडून मी शुभेच्छा घेत होते”. तिच्या हातातील फोटो अरूण कदम यांचा आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही बरेच कमेंट केले आहेत.एका नेटकऱ्यांनी या मजेशीर व्हिडिओवर कमेंट करत, “अरुण कदम महाबळेश्वरचे आहेत का? पुढच्या स्किटमध्ये महाबळेश्वरचा उल्लेख असेल का?” असे प्रश्न केला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “सईला महाबळेश्वरची हॉटेल बुकिंग मिळत नसेल म्हणून ती थोर समाजसेवक अरुण कदम यांना विनंती करत आहे”, अशा विनोदी अंदाजात कमेंट केली.
तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून प्रसाद आणि सईला ट्रोलही केलं आहे. व्हिडिओत दिसत असलेल्या चण्यांच्या वाटीवरून दोघांना टार्गेट केलेलं दिसत आहे. एका नेटकऱ्याने “ते बघ शेंगदाणे” म्हणत कमेंट केला तर दुसऱ्या नेटकऱ्याने “फुटाने संपले नाहीत का अजून?”, “हे दोघं चणे-शेंगदाणे खाताता” असा विनोदी प्रश्न विचारला.