सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 20, 2026 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6

पाच लाखांची बॅग सोडली आणि...; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, "माझ्यासाठी..."

Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ अखेर संपुष्टात आला आहे. ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर तन्वी कोलतेने आपलं नाव कोरलं. ट्रॉफीसह तिने बरीच रक्कम आणि गिफ्ट्सही मिळवले. इतकंच नाहीतर यंदाच्या सर्वच स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. टॉप ५ स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, दीपाली सय्यद हे स्पर्धक होते. या स्पर्धकांमध्ये पाचव्या क्रमांकावर दीपाली सय्यद, चौथ्या क्रमांकावर अनुश्री माने, तिसऱ्या क्रमांकावर विशाल कोटियन, दुसऱ्या क्रमांकावर राकेश बापट आणि विजेतेपद तन्वी कोलतेने पटकावले. दीपालीने एक्सिटनंतर आता सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे.

टॉप ५ स्पर्धकांना स्वतःला एलिमिनेट करुन पैसे घेण्याची संधी एलिमिनेशन राउंडला अगदी सुरुवातीला देण्यात आली. मात्र यावेळी पाचही स्पर्धकांपैकी एकही स्पर्धक पुढे आलं नाही. चार लाखाची रक्कम नाकारतात रितेश देशमुखने ही रक्कम पाच लाख रुपये केली. मात्र पाच लाखाची पेटीही स्पर्धकांनी नाकारली. यावेळी घरातील इतर स्पर्धकांनी दीपाली सय्यदला ही रक्कम घेण्याचा सल्ला दिला. मात्र दीपाली शेवट्पर्यंत तिच्या मतावर ठाम राहिली. यानंतर रितेश देशमुखने अखेर पाचव्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धकांचे नाव घेत दीपालीला बाहेर येण्यास सांगितलं.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

अखेर ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच दीपाली सय्यदने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. दीपालीने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “टॉप ५’ पर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक खेळ नव्हता, तर ते माझ्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न होतं. Thank you ‘बिग बॉस’ मला ही संधी दिल्याबद्दल आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिल्याबद्दल! माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मी इथवर पोहोचू शकले. तुम्ही दिलेला प्रत्येक वोट आणि दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ट्रॉफी आहे. माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभे राहिले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार.
प्रवास संपला असला तरी या आठवणी कायम काळजात राहतील. हे प्रेम असंच कायम राहू द्या”.

आणखी वाचा – “पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

दीपालीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि तिच्या जवळच्या मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दीपालीच्या खेळाचं अनेकांनी यावेळी कौतुकही केलं.

Tags: Bigg Boss Marathi 6deepali sayeddipali sayyad eliminate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
 Deepika Padukone pregnant

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.