दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून सध्या एक दुखद बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपटनिर्माते व बिजनेसमॅन सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्या केली असून त्यांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून माहिती मिळाली असून त्यावर अधिक तपास सुरु आहे. पीटीआयला दिलेल्या जवळच्या सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू येथील महालक्ष्मी लेआऊट येथील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येबद्दल समजताच त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबद्दल काही अपडेट समोर आली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (producer Soundarya Jagadish death )
पीटीआयच्या वृत्तानुसार, जगदीश यांच्या मित्राने पत्रकारांना सांगितले की, “जगदीश यांची आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. पण तरीही त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र सांगू शकत नाही”.
Shocked and saddened to hear of Soundarya Jagadish sir's sudden passing. His presence in the Kannada film industry will be deeply missed. Sending heartfelt condolences to his family and loved ones 🙏
— Tharun Sudhir (@TharunSudhir) April 14, 2024
Om Shanti! pic.twitter.com/BS4DmNzULJ
मिळालेल्या माहितीनुसार जगदीश यांना बँकेकडून एक नोटिस मिळाली होती. त्यामुळे कदाचित यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असे अंदाज बांधले जात आहेत. त्याबद्दल त्यांच्या मित्राने सांगितले की, “नाही. याचा काहीही संबंध नाही. या प्रकरणाला खूप दिवस झाले. बिजनेससंबंधित समस्या वेगळ्या होत्या. तसेच त्यांना कार्डिक अरेस्टबद्दल मृत्यू झाला ही माहितीदेखील चुकीची आहे असे देखील त्यांच्या मित्राने सांगितले”.
ते पुढे म्हणाले की, “त्यांच्याबद्दल समजल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. त्यांनी फास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता”. पोलिस याबद्दल आता सखोल तपासणी करत आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या माहितीनुसार डिसीपी सईदुलु अदावथ यांनी जगदीश यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
जगदीश यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरात ठेवले आहे. तसेच कन्नड निर्माते व दिग्दर्शक थारून सुधीर यांनी श्रद्धांजलीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सौंदर्या जगदीश यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला. कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना”.
जगदीश हे निर्माते होण्याबरोबरच एक बिल्डर व बिजनेसमॅनदेखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबमध्ये कलाकार व सहकारी यांच्याबरोबर रात्री उशीरपर्यंत पात्री केल्याने अडचणीत आले होते. त्यामुळे काही काळासाठी पबचा परवानादेखील रद्द करण्यात आला होता.