‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेलं पाहायला मिळालं. या मालिकेत पारूचा ब्रँड अँबेसिडर होण्यापर्यंतचा प्रवास सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेत पारूची लगीनघाई सुरु असताना पारूच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा आता मालिकेत समोर आलेला पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या भागात प्रीतमला अजयच्या खोट्या आई-बाबांचा शोध लागतो. प्रीतम त्यांच्याकडून सर्व काही खरं वधवून घेताना दिसत आहे. (paaru serial update)
त्यानंतर प्रीतम लगेचच आदित्य जवळ येऊन आदित्यला सर्व काही खरं सांगतो. तेव्हा आदित्य पारुला आता आपल्याला या संकटातून वाचवायला हवं असं म्हणत तो तिला शोधायला जातो. तर एकीकडे पारुला अजय एका बंद खोलीत घेऊन आलेला असतो आणि तिकडे तो पारूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र पारु त्यावेळी चलाखीने आदित्यला फोन लावलेला असतो आणि ती अजयशी बोलण्याच्या नादात आदित्यला सर्व पत्ता सांगून टाकते. मात्र अजयचा याकडे लक्ष नसतं.
त्यानंतर आदित्य पारुने सांगितलेल्या पत्त्यावरील ठिकाणावर पोहोचतो आणि खाली असलेल्या गुंडांना मारहाण करतो. त्यानंतर तो पारू व अजयच्या रूममध्ये जातो तेव्हा आदित्यला पाहून अजय खूपच घाबरतो. तो पारूच्या गळ्याजवळ काचेची बॉटल धरून पारूला मारण्याची धमकी देतो. अजय आदित्यला तिथून निघून जायला सांगतो. आदित्य निघून जात असतो तितक्यात त्याला तिथे ट्यूबलाईट दिसते आदित्य ती ट्यूबलाईट घेतो आणि पारूला खाली वाकायला सांगतो आणि ती ट्यूबलाइट अजयच्या डोक्यात फोडतो. त्यानंतर अजय तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
अजय पळून जातो आणि पारू आदित्यला घट्ट अशी मिठी मारते. आता मालिकेच्या पुढील भागात आदित्य पारुला सुखरूप घरी घेऊन येताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर ती तिच्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असताना पारूला भेटायला अहिल्यादेवी येतात. अहिल्यादेवींना पाहून पारूला काही सुचत नाही त्यानंतर अहिल्यादेवी पारुशी एकट्यात बोलण्याचा निर्णय घेतात आणि पारूला विचारतात की, तुला जे काही बोलायचं आहे ते तू माझ्याशी बोलू शकतेस. आता पारू अहिल्यादेवीकडे मन मोकळं करणार का?, दामिनी व दीक्षाचा हा पलटलेला डाव सर्वांसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेचे येणाऱ्या भागात रंजक ठरेल.