या जगात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्याबद्दल विज्ञान देखील अभ्यास करत आहे. अनेकदा अशा काही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात ज्यामुळे आपण नेहमी विचार करत राहतो. अशीच एक बाब म्हणजे सापाच्या डोक्यावर येणारे केस. म्हाताऱ्या सापाच्या डोक्यावर केस येतात म्हणून आपल्याला आजी किंवा आईकडून ऐकायला मिळालं असेलच. विशेषत: गावामध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतातच. तसेच अनेक वयस्कर व्यक्तीकडून असे साप पाहण्यात आल्याचेही सांगितले जाते. तर हा नक्की काय प्रकार आहे किंवा खरच सापाच्या डोक्यावर केस येतात का? हे जाणून घेऊया. (hair on snake head)
व्हिडीओमध्ये सापाच्या डोक्यावर दिसणारे केस हे उभे आहे आहेत. त्या केसांना वॅक्स किंवा जेल लाऊन उभे केले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे केस आता जाणूनबुजून लावण्यात आहेत का? असा प्रश्नदेखील उपस्थित राहिले आहेत.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटलच्या अहवालानुसार, सापाच्या डोक्यावर केस असतात हे खोटं आहे. तसेच त्यांचे म्हणणे आहे की ही एक अफवा आहे. साप एक रेप्टाइल आहे. म्हणजेच खवल्याची त्वचा असणारा जीव आहे. अशी त्वचा असणाऱ्यांच्या शरीरावर केस येत नाहीत. त्यामुळे एकाद्या रेप्टाइलच्या शरीरावर केस येतात असे कोणीही म्हणाले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.
सापाच्या त्वचेला कात असे म्हणतात. काही दिवसांनंतर साप आपली त्वचा स्वतः शरीरापासून वेगळी करतो. म्हणजेच त्याला सामान्य भाषेत ‘कात टाकणे’ असेही म्हणतात. पण वैज्ञानिकांच्या मते साप कात टाकताना ती पूर्णपणे वेगळी होत नाही. डोक्याजवळ काही त्वचा उरते. त्याला लोक केस समजतात. पण सापाच्या डोक्यावर केस येतात हे पूर्णपणे खोटं आहे. याबद्दल ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या वेबसाइटवरदेखील याबद्दलचा रिपोर्ट आहे. यामध्येही सापाच्या कोणत्याही अवयवावर केस येत नाही असे स्पष्ट केले आहे.