सध्याच्या काळात लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्या वयामध्ये फारसं अंतर नसतं. फार तर ४ ते पाच वर्षांचं अंतर असू शकतं. मात्र हल्ली सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात कधी एखादी म्हातारी स्त्री आपल्या मुलाच्या किंवा नातवाच्या वयाच्या मुलाला आपला प्रियकर बनवते, तर कधी एखादा म्हातारा आपल्या लेकीच्या किंवा अगदी नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका वयोवृद्ध माणसाने त्याच्या नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न केले आहे.
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या नातीच्या वयाच्या मुलीबरोबर दिसत आहे. त्याच्या मागे एक मुलगाही दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये त्या वयोवृद्ध व्यक्तीने व त्या मुलीने लग्नातील कपडे कपडे घातलेले पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या वृद्धाचे नाव रामवृक्ष पंडित असून त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवद्वारे शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडीओला ३.५ मिलियन्सहुन अधिक व्ह्यूक मिळाले आहेत. या व्हिडीओखाली अनेकांनी गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. “आजोबा आम्ही विष घेऊ का?, कोरोनाच्या काळात आमचा मृत्यू झाला असता तर किमान हा व्हिडीओ आम्हाला पाहावा लागला नसता, आजकाल नक्की होत आहे, तरुण मुलं घरी बसली आहेत आणि म्हाताऱ्यांची लग्न होऊ लागली आहेत, हे देवा हे काय झालं.” अशा अनेक कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ बनावट असून केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. रामवृक्ष पंडित यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये या व्यक्तीने अनेक वेगवेगळ्या महिलांबरोबर लग्नाचे व्हिडीओ शेअर केले असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून हे सर्व व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवले गेले असल्याचे दिसून येत आहे.