शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही घटस्फोटापर्यंत…”, ‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनूच्या बायकोचा बऱ्याच वर्षांनी खुलासा, ४०शीमध्येचं झालं होतं निधन, म्हणाली, “खूपच वाईट…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 9, 2024 | 3:25 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
South actress Shantipriya recently opened up about her divorce and current relationship in an interview

"आम्ही घटस्फोटापर्यंत...", 'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूच्या बायकोचा बऱ्याच वर्षांनी खुलासा, ४०शीमध्येचं झालं होतं निधन, म्हणाली, "खूपच वाईट..."

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आणि यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

१९९९ साली सिद्धार्थ दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रियाबरोबर लग्नबंधनात अडकले. अशातच या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने सध्याच्या नातेसंबंधावर भाष्य केलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “एखादं नातं तोडणे ही खूपच सहज शक्य असते. अशातच घटस्फोट होणे ही खूपच वाईट गोष्ट आहे. आमचं नातंही घटस्फोटापर्यंत गेलं होतं. मी याआधी हे कुठेही बोललेले नाही. पण सिद्धार्थ व माझ्यात घटस्फोटावरून नेहमीच चर्चा होत असे. तेव्हा तो मला म्हणायचा की तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. त्यामुळे तुला जे वाटतं ते तू कर.”

View this post on Instagram

A post shared by shanthi priya (@shanthipriya333)

आणखी वाचा – “दोघांचे संबंध असल्याचं…”, स्वतःच्या मित्रावरुन पत्नीवर संशय घ्यायचे रवींद्र महाजनी, गश्मीरच्या आईचा गौप्यस्फोट, म्हणाल्या, “माझ्यावरचा विश्वास…”

यापुढे ती असं म्हणाली की, “घटस्फोटावरुन आमच्यात अनेक चर्चा व्हायच्या. तेव्हा आपल्यात घटस्फोट झाला, तरीदेखील आपण चांगले मित्र म्हणूनच राहू असा विचार आम्ही करायचो. घटस्फोटानंतरही चांगले मित्र म्हणून राहता येतं आणि हेच मी माझ्या मुलांनादेखील सांगते की, एखादे नाते तोडणे हे खूपच सोपे असते. पण एखादे नाते निर्माण करणे हे तितकेच अवघड असते.”  

आणखी वाचा – “‘मोरुची मावशी’ सारखं नाटक करुनही…”, वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, “दुर्देवी गोष्ट आहे की….”

दरम्यान, ‘फुल और अंगार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इतंकाम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर शांतीप्रियाने काम केले आहे.

Tags: Bollywood entertainment newsbollywood newsentertainment newsShantipriyasouth actressदाक्षिणात्य अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीशांतीप्रिया
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ashok Saraf Emotional Incident

जीवघेणा अपघात, ऑपरेशन अन्…; अशोक सराफ यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच आईचं झालं होतं निधन, शेवटचं पाहताही आलं नाही आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.