Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ हे पर्व दिवसेंदिवस चाहत्यांच्या अपेक्षा वाढवत आहे. ‘बिग बॉस’मधील भांडणं, वादविवाद त्याचबरोबर दर आठवड्यात शो मध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. अशातच आता या शोमध्ये पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक पुन्हा एकदा घरवापसी करणार आहे.
घरातील इतर स्पर्धकांना प्रतिस्पर्धी म्हणून तसेच घरातील सदस्यांची एकमेकांमधील स्पर्धा वाढवण्यासाठी या घरात आणखी काही कलाकारांची एण्ट्री होणार आहे. न्यूज १८च्या एका रिपोर्टनुसार पूनम पांडे, राखी सावंत व आदिल यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. याबरोबरच आता घरात आणखी एक स्पर्धक येणार असल्याचे म्हटले जात आहे ती म्हणजे सोनिया. घरात आल्यानंतर काही दिवसांतच ती बाद झाल्यामुळे तिला घरातून बाहेर जावे लागले होते. त्यामुळे तिला या घरात तिचा खेळ दाखवायला वेळ मिळाला नव्हता आणि त्यामुळेच आता तिला पुन्हा घरात आणले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : …अन् दुसऱ्याच अभिनेत्रीचा हात धरुन गार्डन एरियामध्ये बसला विकी जैन, फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
अर्थात याबद्दल अद्याप काही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सोनियाच्या पुनरागमनाच्या या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये व ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस’मध्ये येणाऱ्या इतर काही स्पर्धकांविषयीदेखील चाहत्यांनाही कमालीची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, नुकतंच या शोमध्ये आठवड्याच्या मध्येच स्पर्धक नावीद सोले हा घरातून बाहेर पडला आहे. नावीदला प्रेक्षकांच्या मतांमुळे नव्हे तर त्याच्या सहकारी स्पर्धकांच्या निर्णयामुळे या शोचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे आता आगामी भागात ‘बिग बॉस’च्या घरात कोण येणार? आणि घरातून कोण बाहेर पडणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.