Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी १८ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. दोघांनी सप्तपदी घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अमृता-प्रसादचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. शिवाय प्रसाद-अमृता यांच्या जवळची मंडळी तसेच कुटुंबीयही या क्षणी उपस्थित होते. लग्नासाठी त्यांनी एका सुंदर ठिकाणाची निवड केली होती.
प्रसाद-अमृताने साध्या व अगदी घरगुती पद्धतीने त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. घरातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला. मात्र त्यांना त्यांचं लग्न हे शाही पद्धतीने करायचे होते. आणि म्हणूनच प्रसाद-अमृताने साऱ्यांना आवडेल अशा डेस्टिनेशनची निवड केली. यामुळे सिनेसृष्टीतही दोघांच्या लग्नाची व अगदी प्रमृताच्या लग्नठिकाणाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
प्रसाद-अमृता यांचा तळेगाव, पुणे येथील एका रिसॉर्टमध्ये विवाहसोहळा पार पडला. निसर्गरम्य वातावरणात त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. या रिसॉर्टमध्ये लग्न करण्यासाठी जवळपास एका दिवसाचे ३ लाख इतके भाडे आहे. तर लग्नासाठी करण्यात येणाऱ्या डेकोरेशनचा खर्च २५ हजार ते १ लाखच्या घरात आहे. यावरून प्रसाद-अमृताने त्यांच्या लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले, असल्याचं दिसत आहे.
प्रसाद व अमृताच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नापुर्वीच्या, तसेच लग्नातील व्हिडीओ, फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. प्रसाद-अमृताच्या हळदी समारंभाची तशीच त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले होते. तर लग्नातील त्यांचा लूक लक्षवेधी ठरला. प्रसाद-अमृताच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकारांनीही धमाल-मस्ती केली असल्याचं पाहायला मिळालं. तर प्रसाद-अमृताच्या लग्नानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.