छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस १७’. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमात येणारी वळणं पाहता हा कार्यक्रम बराच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे व विकी जैन हे जोडपं बरंच चर्चेत आहे. सुरुवातीपासून अंकिता व विकीची छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी भांडणं बरीच गाजत आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली आहे. विकी जैन या कार्यक्रमात स्वतःचा खेळ खेळत असल्यामुळे अंकिता एकटी पडलेली पाहायला मिळाली. आता विकीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे विकी बराच ट्रोल होताना दिसत आहे.(Vicky and sana holding each other hands)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत विकी ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरी स्पर्धक सना रईज खानबरोबर तिचा हात धरून बसलेला पाहायला मिळत आहे. दोघेही ‘बिग बॉस’च्या घरातील बागेत बसून बोलत आहेत. विकी व सनाचं हे वागणं व्हिडीओद्वारे बरंच व्हायरल झालं. पण त्यांचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात पसंत पडलेलं नाही. दुसरीकडे अंकिताच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरु आहे. वास्तविक अंकिताने शोमध्ये सांगितलं होतं की तिला मासिक पाळी येत नाही आहे आणि तिची गर्भधारणा चाचणीदेखील झाली होती. मात्र त्याचा निकाल अजून समोर आलेला नाही. त्यामुळे तिच्या गर्भधारणेची बातमी अजूनही स्पष्ट झालेली नाही.
at 0.18 #sanaraeeskhan looks at the camera with one eye after he tells her about the camera watching their finger hockey
— headspace what (@hd14space) November 21, 2023
???????????????? #BiggBoss17 #NeilBhatt #AishwaryaSharma pic.twitter.com/HLIQxRkj6E
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकी यांच्या सुरुवातीला चांगली बॉन्डींग पाहायला मिळाली होती. पण त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. अंकिता बऱ्याचदा घरात बोलताना दिसली की तिला घरात एकटं वाटत आहे. विकी तिच्याबरोबर नाही. तर दुसऱ्या बाजूला विकी पूर्णपणे त्याचा खेळ खेळत असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे अंकिता दुखावलेली दिसत आहे.
अंकिता व विकी हे नवरा-बायको असून त्यांची भेट त्यांच्या एका सामाईक मित्रामुळे झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.