बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. सलमान खानने आजवर त्याच्या हटके स्टाईलने, त्याच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. विविध कार्यक्रमांना सलमान खानने लावलेली हजेरी नेहमीच लक्षवेधी ठरते. यंदाच्या दिवाळीत सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे सलमान सतत चर्चेत असतो. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीमुळे सलमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Salman Khan At IFFI 2023)
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI २०२३) सहभागी होण्यासाठी सलमान गोव्यात पोहोचला आहे. सलमान खानला या कार्यक्रमाला हजेरी लावलेली पाहून त्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी अभिनेत्याने केलेली कृती लक्षवेधी ठरली. यावेळी सलमान एका महिलेकडे गेला आणि त्याने तिला जवळ घेत तिची किस घेतली. अभिनेत्याच्या या कृतीचा व्हिडीओ ‘इफ्फी २०२३’ या कार्यक्रमातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सलमान खानने शानदार एंट्री केलेली पाहायला मिळाली. सलमान या कार्यक्रमात त्याच्या भाचीसाठी पोहोचला होता. अलिझेह अग्निहोत्रीसाठी तो कार्यक्रमात पोहोचला होता. अलीझेह अग्निहोत्री आगामी ‘फरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान त्याच्या भाचीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘फरे’ चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला. IFFI २०२३मध्ये, अभिनेत्याची नजर जमलेल्या जमावातील एका महिलेवर पडली. यावेळी एंट्री घेण्याआधी भाईजान तिच्या जवळ गेला आणि हसत हसत त्या महिलेच्या कपाळावर त्याने किस घेतली. ‘
या कार्यक्रमात सलमान खानची ही कृती पाहून सगळेच थक्क झाले. सलमान खानने ज्या महिलेला किस केले ती ज्येष्ठ पत्रकार असून त्याची चांगली मैत्रीण आहे. पापाराझींनी IFFI २०२३ मधील सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.