शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माणूस म्हणून त्यांनी…”, लेकाला वडिलांचं कौतुक, अशोक सराफांच्या मुलाची भावुक पोस्ट, म्हणाला, “माझ्या वडिलांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Son Aniket shared a special post on social media to congratulate Ashok Saraf on receiving the Maharashtra Bhushan Award.

“माणूस म्हणून त्यांनी...”, लेकाला वडिलांचं कौतुक, अशोक सराफांच्या मुलाची भावुक पोस्ट, म्हणाला, “माझ्या वडिलांनी...”

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राज्य शासनातर्फे दिला जाणारा जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्यावर, त्यांच्या अभिनयावर गेली अनेक वर्ष निस्सीम प्रेम करणारा रसिकवर्ग खऱ्या अर्थाने सुखावला. अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच मनोरंजन, नाट्यसृष्टीसह राजकारण व समाजकारण या स्तरातूनही अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अशातच आता त्यांचा मुलगा अनिकेत सराफनेही वडिलांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराबद्दल कौतुक केलं आहे. अनिकेतने यासंदर्भात एक खास पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर बाबांबरोबरचा एक कोलाज केलेला फोटो शेअर करत त्यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जे काही मिळवले आहे, त्याबद्दल आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला त्यांचा अभिमान वाटला आहे. त्यामुळे आता त्यांना अगदी प्रतिष्ठित मानला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”.

View this post on Instagram

A post shared by Nick Saraf (@nicksaraf)

आणखी वाचा – परदेशात पदवीधर झाला रवी जाधव यांचा लेक, यश पाहून आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट निवडली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 

आणखी वाचा – “हात मिळवल्यानंतर त्याने…”, अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याकडून घाणेरडी वागणूक, मोठा खुलासा करत म्हणाली, “त्याच्याकडून थोडं…”

दरम्यान, अनिकेतने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर अनिकेतला तो हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा दिसत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

Tags: aniket sarafashok sarafentertainment newsMarathi Actor Sonmarathi actorsmarathi entertainmentmarathi entertainment newsअनिकेत सराफअशोक सराफमनोरंजन बातमीमराठी अभिनेता मुलगामराठी अभिनेतेमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Esha Deol and Bharat Takhtanis divorce reason is his extra marital affair know more

१२ वर्षांनंतर संसार मोडला, दोन मुलं अन्...; हेमा मालिनी-धर्मेंद्र यांच्या जावयाचं आहे अफेअर, आता घटस्फोट झाला आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.